Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पक्षभेद व वैचारिक मतभेद विसरून मदतीला धावून आलेले सुधिर भाऊ !





चंद्रपूर : जीवन आणि मृत्यूमधील अंतर कमी होताना शेवटचा प्रयत्न म्हणून हादरलेल्या एका कुटुंबप्रमुखाने वैचारिक व राजकीय मतभेद बाजूला सारून माजी अर्थमंत्री, लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांना एक फोन केला. मुनगंटीवारांनीही पक्षभेद विसरून क्षणात मदत करीत त्यांना साक्षात मृत्यूच्या जिवन आणि मृत्यूमधील हे अंतर कमी करण्यास सरसावले. हा थरारक अनुभव चंद्रपुरातील प्रतिष्ठित नागरिक व काँग्रेस विचारधारेचे लक्की सलुजा यांना हैदराबाद येथे आला. पक्षभेद व वैचारिक मतभेद विसरून मदतीला धावून जाणाऱ्या या वृत्तीमुळे सुधीर मुनगंटीवारांनी आपल्या मनात कायमचे घर केल्याची भावना लक्की सलुजा यांनी व्यक्त केली. त्यावेळी ते भावुक झाले होते.

हा प्रसंग आहे चंद्रपूरातील प्रतिष्ठीत सलुजा कुटुंबातील ! सलुजा यांची बहीण चंद्रपुरात आली होती. यामुळे त्यांना आपल्या घरात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो असा संशय आला. सहपरिवार हैदराबाद येथील फ्लॅटवर जाऊन राहू म्हणून १८ एप्रिल रोजी लक्की सलुजा हे पत्नी व मुलीसह हैदराबादला निघाले. त्यांचा संशय खरा निघाला. २२ एप्रिल रोजी मुलगीही पॉझिटिव्ह निघाली. घरातील तिघेही पॉझिटिव्ह निघाल्याने सलुजा चिंताग्रस्त झाले. २५ एप्रिलला त्यांना वाटले की आता रुग्णालयात खोली मिळणे आवश्यक आहे. यानंतर रुग्णालयाच्या चकरा सुरू झाल्या. ५० हजार रुपये भाडे असेल तरी द्यायची तयारी होती. पैसा हा मुद्दाच नव्हता. मात्र एकही खोली मिळत नव्हती. धन-संपत्ती यावेळी थिटी पडल्याचे सलुजा यांनी जाणवत होते.

आता कोरोना म्हटले तरी अंगावर शहारे येतात. कोरोनावर मात करण्यासाठी गडगंज संपत्ती असली तरी ती वेळेवर कामी येत नाही. अशी अनेक उदाहरणे दिवसागणिक पुढे येत आहे. याचा प्रत्यय लक्की सलुजा यांना हैदराबाद येथे आला. कितीही पैसा मोजायला तयार असताना तो उपयोगात येत नव्हता. मात्र एका फोनपुढे पैसाही थिटा पडला, असेही सलुजा यांचे म्हणणे आहे.
२६ ते २९ पर्यंत हैदराबाद येथील पंचतारांकित हॉटेलातही सलुजा यांना खोली मिळाली नाही. स्वत:च कोरोनाचा रुग्ण असल्यामुळे वाहनात चालकही ठेवू शकत नव्हते. रुग्णालयात खोली मिळणे तर दूरच वाहनतळावर वाहन ठेवायला तासभराचा वेळ लागायचा. २९ एप्रिलला मुलीचा एचआरसीटी अहवाल प्राप्त होताच डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. काहीही सुचत नव्हते. पैसा आहे. गाडी आहे. स्टाफ आहे. सर्वकाही सुविधा विकत घेऊ शकण्याची कुवत आहे. मात्र परिस्थितीपुढे हतबल होण्याशिवाय काहीही करू शकत नसल्याचे त्यांना वाटत होते. चंद्रपुरातून रेमडेसिविर इंजेक्शनही बोलाविले होते. ६० किलो वजनाचे ऑक्सिजन सिलिंंडरही बोलावून ठेवले होते. मात्र याचा अनुभव नसल्याने काहीच करू शकत नव्हतो. रुग्णालय व डॉक्टरी उपचाराशिवाय पर्याय नव्हता.
याबाबत आपबिती सांगताना सलुजा म्हणाले, सुरुवातीला परिस्थितीशी भांडलो. मात्र नंतर हादरलो होतो. पुढचे चार दिवस असेच भटकावे लागले तर खोली नाही तर आयसीयु रुग्णालय शोधावे लागेल. ही स्थिती होती. डोक्यात विचारांचे थैमान सुरू झाले. जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टींमधील अंतर कमी होताना दिसत होते. सर्व पर्याय संपले होते. हातातून वेळ जात होता. आपण चंद्रपूरचे आणि हैदराबादला कोण मदतीला धावून येईल, तेव्हा एकच नाव डोळ्यापुढे आले. ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार. हीच व्यक्ती आपल्याला या क्षणी मदत करू शकेल. या आशेने पक्षभेद, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून मुनगंटीवार यांना एक फोन करून सर्व आपबिती सांगितली. यानंतर त्यांनी क्षणात जी मदत केली. त्यामुळे जीवन-मृत्यूतील अंतर वाढले.
मुनगंटीवार यांनी त्याच रात्री रुग्णालय मिळवून दिले. त्यानंतर सारे काही सुरळीत झाले. आजही आम्ही तिघेही त्या रुग्णालयातच आहोत. गडगंज संपत्ती असली तरी ही मदत अमूल्य आहे. कुणाच्याही वाट्याला येऊ नये असा हा विचित्र अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदाच होता. या संकटसमयी एखाद्या देवदूताप्रमाणे धावून केलेल्या मदतीमुळे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनाच्या देव्हाऱ्यात स्थान पक्के केले आहे.

रुग्णवाहिकेतून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न
सुधीर मुनगंटीवार यांनी जी मदत केली, त्याची भरपाई करूच शकत नाही. आम्ही कुटुंबीयांनी तेव्हाच विचार केला. आपणही समाजाचे देणे लागतो. रुग्णालयातूनच एक रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय घेतला आणि लगेच सर्व सोपस्कार पूर्ण केले. वाढत्या मागणीमुळे नवीन रुग्णवाहिका लगेच मिळत नव्हती. मात्र हैदराबाद येथे रुग्णवाहिकेचे काम करणारा महाराष्ट्रीयन होता. त्यात रुग्णवाहिकेवर सुधीर मुनगंटीवार यांचे छायाचित्र लावायचे असल्याचे सांगितल्याने त्यानेही अत्यंत कमी वेळात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. ही रुग्णवाहिका बल्लारपूर येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या साक्षीने रुग्णसेवेत रूजू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies