रूग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत कोविड योद्धा यांचा अॉक्सिजन न मिळाल्याने ओढावला मृत्यू !
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रूग्नालय चंद्रपूर येथे दहा महिने पगार न घेता, प्रामाणिकपणे काम करत असलेल्या श्री. सुदेश सुखदेव ठेंभरे (५८) बिनबा गेट, नेहरू शाळेजवळ, चंद्रपुर गवर्मेंट हस्पिटल चंद्रपुर ( इलेक्ट्रीशियन डिपार्टमेंट) येथे कार्यरत कामगाराची आरोग्य सेवा देत (कोरोना) ची लागन झाल्याने ऑन डूटी मृत्यू झाल्याची खडबळजनक घटना घडली. खळबळजनक बाब म्हणजे सुरेश ठोंबरे या मृतकाची ऑक्सिजन लेवल कमी झाली असतांना सुद्धा कोविड योद्धा असलेल्या रूग्णाला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही संतापजनक बाब असून शासकीय रुग्णालयातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मागील तिन महिन्यापासून आपल्या रास्त मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या रास्त मागण्यांवर अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही. कोविड योद्धा असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ऑक्सिजन न मिळाल्यामुळे शासकीय रुग्णालयात झालेला मृत्यू ही शर्मनाक बाब आहे.
सविस्तर माहिती अशी की, जिल्हा सामान्य रूग्नालयातील तात्कालीन मुख्य आरोग्य अधिकारी.श्री मोरे साहेब.डिन अस्तांना कत्राटी पद्दतीवर काही कामगार रूग्नालयातील सेवे करीता घेण्यात आले होते.रुग्णालयातील काम हे एका नामवंत कंपनीला E निविदा या कायदेशिर तत्वावर दिले गेले होते, परंतु काही दिवसानंतर राजकिय षड्यंत्राराला बळी पडून कत्राटदारानी कंत्राट रद्द झाले असे सांगून कायदेशीर कंत्राट मोडीत काढीत कंत्राट मध्येच सोडल्यामुळे शासकीय वैद्दकिय रूग्नालयातील कंत्राटी कामगार यांना गेले दहा महिन्या पासुन वेतनाकरीता मुकावे लागले, कामगारांच्या वेतनाकरीता फंडसुध्दा आलेला असतांना मेडिकल हॉस्पिटलचे डिन यांनी तो कामगारांना वितरीत न करता वापस पाठवला, मुळ मालक म्हणून मुख्य वैद्यकिय अधिकारी यांची ही जबाबदारी असतांना देखील कामगारांच्या वेतन अदा करण्यासंदर्भात दुर्लक्ष केल्या गेले,या सगळ्या प्रकरनामधे मात्र निष्टेने सेवा देनारा कामगार हा आपला जिव धोक्यात घालून कोविट १९ सारख्या भयंकर बिमारीमध्ये.सेवा देत राहिला.परंतु अनेक आंदोलने होऊन व पत्र व्यवहार करून सुद्धा तेथील कामगारांना न्याय मिळाला नाही.