ब्रम्हपुरी :- तालुक्यातील दक्षिण ब्रम्हपुरी वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आवळगाव उपक्षेत्रातील वांद्रा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक 165 मध्ये तेंदू पाने आणायला गेलेल्या चीचखेडा येथील भाऊराव दोडकू जाम्भूळे हा वाघाचे हल्यात जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 26 मे रोजी सकाळी साडे पाच वाजे दरम्यान घडली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष मेंढे,वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राम्हणे आणि इतर वन कर्मचारी मोक्यावर पोहचून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू आहे वन विभागाकडून मृतकाचे वारसास तात्काळ 20 हजार रुपयांची मदत देण्यात आली असून उर्वरित 4 लाख 80 हजार रुपये धनादेश पुढील कारवाई नंतर देण्यात येणार असल्याचे वन अधिकार्यानी सांगितले. सदर ठिकाणी वन कर्मचारी आणि वनमजुर आदींच्या गस्त कार्यक्रम लावण्यात आला असून परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत.