Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी भिती न बाळगता कोविद लसीकरण करुन घ्यावे - संजय गजपुरे , जि.प.सदस्य
गंगासागर हेटी या जंगलबहुल प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आता कोविद लसीकरणाची सोय

नागभीड :- कोविड चे वाढते रुग्ण लक्षात घेता व सुरक्षिततेच्या दष्टीने मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आता लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. नागभीड तालुक्यातील जंगलबहुल व अतीदुर्गम ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाची सोय नसल्याने नागरिकांना अडचणी येत होत्या. नजिकच्या केंद्रावर लसीकरणाची सोय करण्याची मागणी लक्षात घेता चंद्रपूर जिल्हा प्रशासन व जि.प.आरोग्य विभागाने आता सर्वच आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर कोविद लसीकरण केंद्र सुरु केले आहेत.
            आज नागभीड तालुक्यातील वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत गंगासागर हेटी या उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरणाची सुरुवात पारडी-मिंडाळा-बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.,  तालुक्यात यापूर्वी ग्रामीण रुग्णालय,नागभीड व नवेगाव पांडव , तळोधी बाळापुर , वाढोणा,मौशी, बाळापुर बुज. या आरोग्य केंद्रासह काही मोजक्या उपकेंद्राच्या  ठिकाणी लसीकरण होत असल्याने  जंगलबहुल नागभीड तालुक्यातील नागरिकांना केंद्रावर पोहचण्यासाठी अडचण येत होती. गंगासागर हेटी येथे जि.प.प्राथमिक शाळेत तालुका आरोग्य अधिकारी डॅा.विनोद मडावी यांच्या नियोजनातुन व वाढोणा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल डोर्लीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाची सोय करण्यात आली होती. 
            तालुक्यातील ४५ वर्षावरील सर्वच नागरिकांनी मनात कुठलीही भिती न बाळगता कोविद लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी याप्रसंगी केले व परिसरातील नागरिकांना कमी अंतरावर लसीकरण घेता येण्यासाठी गंगासागर हेटी या उपकेंद्रावर लसीकरणाची सोय उपलब्ध केल्याचे सांगितले .आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार कोविशिल्ड लसीचा दुसरा डोज आता ८४ दिवसानंतर दिल्या जाणार आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत: च्या व कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची विनंती केली.
               लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी गंगासागर हेटी येथील   सरपंच दिलिप गायकवाड ,उपसरपंच पि.डी. बोरकर , उश्राळमेंढा चे सरपंच हेमराज लांजेवार, मिंडाळा ग्रा.पं.सदस्य व माजी उपसरपंच विनोद हजारे , आकापुर चे मोतीराम पाटील भाकरे , ग्रामसेवक वाय.पी.कापगते , कैलास अमृतकर, होमराज खांडेकर,उपकेंद्राच्या हिवरकर मँडम, पर्वते मँडम , आकापुर च्या आशावर्कर सौ.शुभांगी भाकरे , उश्राळमेंढा च्या आशावर्कर सौ.सारिकाताई शेंडे व संगणक चालक मेघशाम मस्के यांची उपस्थिती होती. गंगासागर हेटी ग्रामपंचायत ने लसीकरणासाठी जनजागरण व पिण्याच्या पाणी सह सर्वपरीने मदत केली होती . भाजपाच्या वतीने यावेळी मास्क चे वितरण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies