Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आंतरराष्ट्रीय अग्नीशमन दिन विशेष
दिन विशेष :- ४ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय अग्नीशमन दिवस मानून जगभरात साजरा केला जातो . ऑस्ट्रियालिया मध्ये बुशफीरे येथे भीषण परिस्थितीत पाच अग्निशमन दलाच्या जवानांचा मृत्यू झाला त्यामुळे 1जानेवारी 1999 रोजी याबाबत जगभरात प्रस्ताव पाठवल्यानंतर याची स्थापना करण्यात आली. आजच्या समाजात अग्नीशमन दलाची भूमिका हि खूप महत्वाची आहे . आंतरराष्ट्रीय अग्नीशमन दिवशी वर्तमान आणि भूतकाळातील अग्नीशमन दलाच्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानले जातात ज्यामुळे आपला समुदाय आणि पर्यावरण शक्य तितके सुरक्षित राहील याची खात्री करू शकता.
              गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध भागांमधील रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या आगीच्या घटना हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय झाला आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना ताजी असतानाच पालघर जिल्ह्यात आगीची भयंकर घटना घडली आहे. विरार येथील विजय वल्लभ या कोविड रुग्णालयात आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे या हॉस्पिटलच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात (ICU) मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लागली. आयसीयूधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. वॉर्डात ऑक्सिजन असल्यानं आग लगेचच सर्वत्र पसरली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. आगीची घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ हालचाली करून काही रुग्णांना वाचवले. मात्र, १३ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्या मध्ये महाराष्ट्रात निदान चार मोठ्या रुग्णालय दुर्घटना व अपघात झाले आहेत. या चारही घटनांमधील मृतांची संख्या ५७ वर गेली आहे.
                 अग्नीशमन दल प्रत्येक शहरात कार्यरत असले तरी सध्याची परिस्थिती बघता समाजातील प्रत्येक व्यक्तीने अग्नीशमन प्रशिक्षण घेणे अथवा त्याविषयी माहिती असणे काळाची गरज आहे तसेच उपयुक्त आहे . याबाबत बाजारामध्ये विविध पुस्तके उपलब्ध असले तरी सनातन संस्था द्वारा प्रकाशित 'अग्नीशमन प्रशिक्षण ' हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे . वाचकांनी तो अवश्य अभ्यासावा व संग्रही ठेवावा.

संकलक
कमलेश थोटे मो. 9767065660

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies