Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कोविड रूग्णांवर कार्यपद्धतीनुसार उपचार न झाल्यास रूग्णालयाचा परवाना रद्द - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने





चंद्रपूर दि.4, कोविड रूग्णांवर विहित कार्यपद्धतीनुसार उपचार न केल्यास तसेच चंद्रपूर कोविड-19 पेशन्ट मॅनेजमेंट पोर्टलवर नोंदणी न करता परस्पर रूग्ण दाखल करून घेणाऱ्या कोविड रूग्णालयाचा परवाना नियमानुसार कारवाई करून रद्द करण्यात येईल, असे आदेश आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे गंभीर रुग्णांना अनेक ठिकाणी बेड उपलब्ध असूनही त्याची माहिती उपलब्ध होत नाही व त्यांना हॉस्पिटलसाठी वणवण फिरावे लागत होते त्यामुळे त्यांना प्राथमिकतेनुसार आय.सी.यु., व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळावे, यासाठी चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. यात कोवीड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयाने रुग्णांची नोंदणी पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण त्यांना बेड उपलब्ध करून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये थेट जाऊन उपचार घेतील. शहरातील सर्व कोवीड हॉस्पिटल रुग्णांना परस्पर दाखल करून न घेता या प्रणालीवर नोंदणी केलेल्या प्रतिक्षा यादीतीलच रूग्णांना भरती करून घेतील, यामुळे गरजू रुग्णांना बेड उपलब्ध होणार आहे.


पोर्टलच्या माध्यमातून 56 रुग्णांना मिळाले बेड

चंद्रपूर दि.4, जिल्ह्यात कोराना रुग्णांना चंद्रपूर शहरातील शासकीय व खाजगी रूग्णालयात सहजरित्या ऑकसीजन बेड उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल’ सोमवारपासून कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आज सायंकाळपर्यंत 120 रूग्णांची बेड मिळण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 53 रुग्णांना ऑक्सीजनचे तर 3 रूग्णांना आय.सी.यू. असे 56 रूग्णांना बेड प्राप्त झाले आहे. 29 रूग्णांनी नोंदणी केल्यानंतर बेड घेण्यास नकार दिला आहे तर 35 रूग्ण बेडसाठी प्रतिक्षायादीत आहेत. पोर्टलवर सध्या चंद्रपूर शहरातल्या 28 रूग्णालयामधील 1296 बेडची नोंदणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies