Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पालकमंत्र्यांनी डावलले की जिल्हाधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष, या चर्चेला ऊत !







जिल्ह्यातील आमदार बसले प्रेक्षक गॅलरीत, लोकप्रतिनिधींचा अपमान आरोप आणि महत्वाच्या बैठकीवर आमदारांचा बहिष्कार !

खरीप हंगामाच्या नियोजन भवनाच्या आढावा बैठकीत घडले प्रकरण !


चंद्रपूर : आज 15 में रोजी पालक मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली काही आढावा सभांचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीतील खरीप हंगामाच्या बैठकीत जिल्ह्यातील आमदारांना प्रेक्षक  गॅलरीत बसविण्यात आल्यामुळे राजुऱ्याचे आम. सुभाष धोटे, व भद्रावतीच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचा बहिष्कार केला. पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींना डावलण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले पालकमंत्र्यांनी स्वतःला या चर्चेला उधाण आले आहे. महत्वाचे म्हणजे पालकमंत्र्यांनी स्वतः लोकप्रतिनिधींना प्रेक्षक गॅलरीत बसविले म्हणून अधिकाऱ्यांना खडसावले. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना खडसावले ही पालकमंत्री यासाठी नवीन बाब नाही, "मी मारल्यासारखा करतो आणि तू रडल्यासारखा कर" अशी जुनी असलेली म्हण जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आत्तापर्यंत घडलेल्या प्रकरणांमध्ये तंतोतंत जुडणारी आहे. प्रोटोकॉल चे पालन करण्यात आले नाही, लोकप्रतिनिधींचा  अपमान करण्यात येतो, ही बाब आता जिल्ह्यात नेहमीची झाली आहे.

खरिपाचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत मानापमान नाट्य रंगले सत्ताधारी काँग्रेसचे खासदार आणि आमदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला त्यानंतर वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली  बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात  बैठकीचे आयोजन करण्यात आले अत्यंत महत्त्वाची बैठक असल्यामुळे खासदार बाळू धानोरकर आमदार प्रतिभा धानोरकर आमदार सुभाष धोटे आमदार किशोर जोरगेवार आणि बैठकीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठकीस उपस्थित होते आमदार आणि खासदार बैठकीच्या सभागृहात पोहोचतात त्यांना धक्काच बसला अधिकारी आणि पालकमंत्री यांची बसण्याची व्यवस्था मंचावर करण्यात आली खासदारांना मंचावर स्थान देण्यात आले मात्र आमदारांची बसण्याची व्यवस्था खाली करण्यात आली त्यामुळे यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत बहिर्गमन केले खासदार धानोरकर यांनी ही आमदारांच्या या भूमिकेचे समर्थन करीत सभागृहातून ते बाहेर पडले या सर्व प्रकारामुळे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकार्‍यांना चांगलेच खडे बोल सुनावले तसेच बैठकच रद्द केली.
जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ज्या आमदारांच्या अपमान केला त्यांनी प्रोटोकॉल चे पालन झाले नाही असा आरोप दृकश्राव्य माध्यमांसमोर केला. महत्वाचे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या या भयावह स्थितीत सध्या प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये सामंजस्याचा अभाव आहे. हा अभाव दूर करण्यात कोणत्याही बद्दलच्या पुढाकार कोणत्याही लोकप्रतिनिधींनी घेतले नाही. आज मानापमानाच्या नट्या वरून लोकप्रतिनिधी एखाद्या महत्वाच्या सभेचा बहिष्कार करत असते तर ही बाब ही जिल्ह्यासाठी विचार करणारी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies