Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कोरोना नियंत्रणसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी पाठीवर पंप घेऊन केली फवारणी





ताडाळी :- गावात कोरोना महामारिने थैमान घातले होते.अनेक नागरिकांना कोरोनामुळे स्वतः चा जीव गमवावा लागला.पेशंट ची संख्या खूप वाढत जात असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.ग्रामपंचायत ने दोन माणसे खास फवारणीसाठी रोजनदारीने लावली.पण पूर्ण पणे परिस्थिती जर आटोक्यात आणयची असेल तर राजाला सुद्धा प्रजेच्या रक्षणासाठी रणांगणात उतरावं लागत.हा विचार डोळ्यासमोर ठेवून सरपंच संगीता पारखी आणि उपसरपंच निकीलेश चामरे यांच्या साथीने सदस्य संजोग अडबाले आणि अशोक मडावी यांनी स्वतः च्या पाठीवर फवारणी पंप घेऊन संपूर्ण गावात फवारणी केली.सोबतीला कृणाल दिवसे,राहुल खांडरकर,नितेश नागरकर,दीपक निखाडे,शुभम चौधरी,श्रावण जाणवे यां युवा कोविड योद्धा मित्रांनी सुद्धा पाठिवर पंप घेऊन फवारणी केली.सर्व ग्रामपंचायत कमिटी चे सदस्य अनिता उगे,मालती आमटे,कविता निखाडे,इंदिरा कासवटे आणि बबन कासवटे,कृष्णाजी बाम,विठ्ठल सुर,शैलजा पाटील,सत्यशीला उमरे यांनी आणि गावातील नागरिकांनी या कार्याची दखल घेत संजोग आणि अशोक तसेच सर्व कोविड योद्धा मित्रांचे प्रशंसनीय कौतुक केले.यावेळी पियूष दिवसे आणि सुमित निखाडे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies