चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक तथा झोन सभापती अंकुश सावसागडे यांचे कोरोना आजाराने दुःखद निधन ते प्रभाग क्र 3 इंदिरानगर येथील नगरसेवक होते
जनतेच्या हाकेला तत्परतेने ओ देणारा कार्यक्षम नगरसेवक हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार
जनतेच्या हाकेला तत्परतेने ओ देणारा कार्यक्षम, कार्यतत्पर। नगरसेवक हरपल्याची शोकभावना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
एम.ई.एल. प्रभाग क्र. २ चे नगरसेवक अंकुश सावसाकडे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या प्रभागात जे सेवाकार्य केले त्याला तोड नाही. लॉकडाउन दरम्यान प्रतिबंधीत क्षेत्रात धान्यकीट, जेवणाचे डबे आणि सहाय पुरविण्यात ते अग्रेसर होते. त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी निधी खेचून आणण्यात ते अग्रेसर राहायचे. झोन सभापती म्हणून सुध्दा त्यांनी अल्पावधीत उल्लेखनिय कामगीरी केली. तळमळीने कार्य करणारा लोकाग्रणी नगरसेवक भारतीय जनता पार्टीने गमावल्याची भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पार्टी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या दुःखातुन सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो असेही त्यांनी म्हटले आहे.