बल्लारपुर;- येथील आंबेडकर वॉर्ड इथे आज सायंकाळी सहा चा सुमारास राकेश दर्शन बहूरीया वय 37 हा आपल्या ऍक्टिव्हा गाडी वरून घरी येत असताना गल्लीत लपून असलेले दोन आरोपीनी राकेश दर्शन बहूरीया याचा वरती तलवारीने गळ्यावर वार करून गळा कापण्यात आला गळ्यातून रक्ताची धार वाहून राकेश दर्शन बहूरीया याचा जाग्यावरच मृत्यू झाला मृतक व आरोपी आपसी संबंधित आहे, डुक्कर चोरीच्या वादातून हत्या करण्यात आली असे बोलल्या जात आहे, हत्या करणारा एका आरोपीला काही वेळातच पोलिसांनी अटक केली आहे एक आरोपी फरार झाला आहे, पोलिसांनी मृतक चा पंचनामा करून शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले. पुढील तपास बल्लारपुर पोलीस करीत आहे.
तलवारीने गळ्यावर वार करून राकेश बहूरीयाची हत्या
मे ३०, २०२१
0
Tags