Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर जिल्ह्यात आज 960 कोरोनामुक्त, 234 पॉझिटिव्ह तर 13 मृत्यू



आतापर्यंत 75,483 जणांची कोरोनावर मात

ॲक्टीव पॉझिटिव्ह 4,627

चंद्रपूर, दि.25 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 960 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 234 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 13 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 81 हजार 512 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 75 हजार 483 झाली आहे. सध्या
4 हजार 627 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 59 हजार 496 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 75 हजार 89 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील रामपूर येथील 55 वर्षीय पुरुष, तुकूम परिसरातील 72 वर्षीय महिला, 48 ,50 व 72 वर्षीय पुरुष.
बल्लारपूर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 65 वर्षीय महिला. गोंडपिपरी तालुक्यातील इंदिरा नगर येथील 85 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 80 वर्षीय पुरुष. तर गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1402 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1299, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 47, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 234 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 80, चंद्रपूर तालुका 24, बल्लारपूर 21, भद्रावती 14, ब्रम्हपुरी 02, नागभिड 12, सिंदेवाही 04, मूल 08, सावली 02, पोंभूर्णा 03, गोंडपिपरी 02, राजूरा 22, चिमूर 02, वरोरा 11, कोरपना 20, जिवती 05 व इतर ठिकाणच्या 02 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies