Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपुरात म्युकोर मॉयकॉसिसचे तब्बल 20 रुग्ण




चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराने डोके वर काढल्याने आरोग्यविषयक चिंतेत आणखी भर घातली आहे. चंद्रपुरात म्युकोर मॉयकॉसिसचे तब्बल 20 रुग्ण सापडले आहेत. हा आजार कर्करोगापेक्षा दहा पट जास्त गतीने शरीरात पसरतो. यामुळे कित्येक जणांना त्यांचा जबडा, डोळे खराब होतोय आणि प्रसंगी त्यांना जीव देखील गमवावा लागत आहे.
म्युकोरमॉयकॉसिस हा आजार दुर्मिळ असला तरी नवा नाही.प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांना या आजाराचा धोका असतो. मात्र, कोरोनामुळे या आजाराचा धोका बळावला आहे. ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. मात्र, कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. या बुरशीचा कण शरीरात गेल्यावर फुफ्फुसात तसेच सायनसवर त्याचा दुष्परिणाम होतो. याची लागण एकापासून दुसऱ्याला होत नाही.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

हा दुर्मिळ आजार असला तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांना ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसचा धोका असतो. कोविड १९ मुळे त्याची लागण होत असल्याची बाब नवी व धोकादायक आहे. हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचे कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस तसेच सायनस याच्यावर दुष्परिणाम करतो. याची लागण एकापासून दुसऱ्याला होत नाही.

कोविड १९ आणि म्युकरमायकोसिस


मधुमेह, फार जास्त दिवस रुग्णालयामध्ये ॲडमिट राहणारे, रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारी औषधी यामध्ये कोविड -१९ चा उपचार घेत असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी स्टेराईड आणि काही औषधे देण्यात येतात. यामुळे त्याच्या प्रतिकारशक्तीवर बिकट परिणाम होतो. यामध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

म्युकोर मॉयकॉसिसची लक्षणे -


चेहऱ्यावर सूज येणे, दात दुखणे, दात हलणे, हिरडयातून पस येणे, जबडयाचे हाड उघडे पडणे, तोंडातून घाणेरडा वास येणे, नाकातून रक्त येणे, डोळ्यांवर सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे, नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे.


उपचार काय -


तातडीने निदान करून बुरशी प्रतिकारक उपचार पद्धती अवलंब करणे आवश्यक आहे. संसर्ग शरीराच्या इतर भागात जसे जबडा, डोळे, सायनसपर्यंत पोचला, तर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते. उपचार किंवा निदान करण्यात विलंब लावल्यास दृष्टी जाऊ शकते. जबडयाचा भाग काढावा लागू शकतो. पंधरा दिवसांत हा संसर्ग 'सर्वदूरपर्यंत पोहोचल्यास रुग्णांच्या मृत्यूची शक्यता ८० टक्के असते. त्यामुळे कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांनी एकदा आरोग्य तपासणी न चुकता करून घ्यावी, असे आवाहन नोडल अधिकारी म्युकोर मॉयकॉसिस तथा दंतशल्यचिकित्स डॉ. आकाश कासटवार यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies