भद्रावती तेंदूची पाने गोळा करण्यासाठी गेलेल्या 35 वर्षीय रजनी भालेराव चिकराम या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चिपराला बिट ऑर्डनन्स फॅक्टरी भागात आज सकाळी रजनी भालेराव तेंदूची पाने गोळा करण्यासाठी गेल्या होत्या दबा धरून बसलेल्या वाघाने रजनी यांचेवर हल्ला चढविला अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी कोके येथील महिला तेंदूची पाने गोळा करण्यासाठी दिवान तलाव परिसरात गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करून ठार केले ही घटना सकाळच्या सुमारास घडली. मृतक महिलेच नाव सीताबाई गुलाब चौके (वय ५५) कोकेवाडा पेंढरी येथील रहिवासी आहे.
सावली तालुक्यातील निफन्द्रा येथील रामा मारबते वय 60 वर्ष हे शेतकरी आज आपल्या घरून सकाळी 10 वाजता जंगलातून डार आणण्यासाठी गेलेले असता मंगर मेंढा रोड वरील नवीन फिल्टर लाईन च्या परिसरात या शेतकर्यावर वाघाने हल्ला करीत त्याचे शरीर धडा वेगळे करून ठार मारले असल्याचा आज दुपारी 4 च्या सुमारास उघडकीला आला