भद्रावती :- येथील जैन मंदिर कोविड सेंटर मधील एका ६० वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आल्याने ती उपचार घेत होती. पण तिची अचानक तब्बेत खालावली असता त्या महिलेला चंद्रपूर मधे हलविण्याचे भद्रावती तेथील डॉक्टरने लिहून दिले, डॉक्टर च्या या सांगण्यावरून त्या महिलेला चंद्रपूर मेडिकल कॉलेज म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयासह चंद्रपुर शहरातील सर्वच रुग्णालयात नेण्यात आले, पण कुठेही बेड मिळाला नाही आणि शेवटी सर्व रुग्णालये फिरल्यानंतर त्या महिलेने अम्बुलँस मधेच अखेरचा श्वास घेतला.