Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूरात दारूचा पूरवठा करणारा कोण "विशाल" अडाणी ?


R.M media centre
R.M media centreचंद्रपूर :- "विशाल" अडाणी नावाचा दारू विक्रेता सध्या चंद्रपूरात सक्रिय झालेला असल्याची अधिकृत माहिती आहे. शासकीय नियम व निर्देशांना तिलांजली देऊन "विशाल" अडाणी नावाचा व्यक्ती चंद्रपुरात दारूच्या पुरवठा करीत आहे अशी चर्चा सुरू आहे आहे. कोण हा "विशाल" अडाणी अशी चर्चा आज जिल्ह्यात सुरू आहे. परंतु पोलीस विभागाला या विशाल अडाणी बद्दल संपूर्ण माहिती असल्याचे ही दारू विक्रेते सांगतात. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा विशाल दोन वर्षापासून दारूच्या व्यवसायात सक्रीय असून जिल्ह्यातील एका नेत्याचा याला "वरदहस्त" असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी "विशाल" ला जेरबंद करण्यासाठी कंबर कसून आहेत, परंतु जिल्ह्यातील नेत्याच्या आशिर्वादामुळे तुरी देत असला तरी "विशाल" चे आज ना उद्या कंबरडे तुटतील यात शंका नाही. एकीकडे "घरातच रहा व स्वस्थ रहा" असा संदेश दिला जात आहे तर दुसरीकडे हा विशाल या सगळ्या नियमांना धाब्यावर ठेवून शहरात "दारू" चा साठा जमा करण्यात मग्न असून नुकताच दारू साठ्याचा मोठा "जखिरा" शहरात आल्याची चर्चा सूरु आहे.


नुकतेच दोन दिवसांपूर्वी वरोरा पोलिसांनी 30 लाखांच्या जवळपास मुद्देमालासह दारू साठा पकडला. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करता येईल असे निर्बंध असताना चंद्रपूर जिल्ह्यात पर जिल्ह्यातून येणारी दारू व त्याची विक्रेते हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वीची मोहल्ला कमिटी तीन दिवसापासून सक्रिय झाले असून जिल्ह्यात दारू चा पुरवठा सूरू असल्याची अधिकृत माहिती आहे. महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लाॅकडाऊन केल्यानंतरही मागील तीन दिवसापासून दारूबंदी असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये नियमितरित्या दारूचा पुरवठा होत आहे. संबंधित अधिकारी वर्ग या ठिकाणी "कुठे मुंग गिळून बसला आहे. ते कळायला काही मार्ग नाही. सर्वसामान्यांना घरात बसा व निर्देशांचे पालन करा असे सांगणारी शासकीय यंत्रणा चुकीच्या मार्गाने होत असलेल्या अवैध व्यवसायावर आळा बसविण्यासाठी कां बरे निष्क्रिय होत आहे? याची चाचपणी लोकप्रतिनिधींनी अवश्य करायला हवी.

1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे परंतु या ठिकाणी खुलेआम दारू विक्री होते, यात काही शंका नाही. कोरोना संक्रमणाचा प्रादूर्भाव बघता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंतु जिल्हाबंदी नंतरही चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा होत आहेत. निर्देशित केलेले नियम जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंधानुसार लागू केलेले आहेत. सामान्य नागरिक या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असून स्वतःची, शेजाऱ्यांची व कुटुंबाची प्रकृती सुदृढ राहो, कोरोनाचे संकटापासून त्यांना दूर ठेवावे व शासन निर्देशांचे पालन करावे या मध्ये मग्न आहे परंतु चंद्रपुरातील दारूविक्रेत्यानी व त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिस विभागातील काही गद्दारांनी मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून दारू पुरवठा करण्याची शपथ घेतली आहे की काय? या पद्धतीने हा व्यवसाय सुरू केला आहे. ज्यांचे वर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत व ज्यांची दारू विक्रेते म्हणून पोलीस विभागात नोंद आहे अशा काही दारू विक्रेत्यांना सोबत घेऊन चंद्रपुरात दारूचा पुरवठा सुरू केला आहे. समाजाला कलंकित करणारे व आणीबाणीच्या स्थितीमध्ये, जीवावर उदार झालेल्या नागरिकांना वेठीस धरणारे पैशाला सगळे काही समजत आहे जिल्ह्यातील दारू विक्रेते त्यांची सोबत करणारे निर्लज्ज व बेईमान पोलीस अधिकारी यांच्या संगनमताने चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालेला देशी-विदेशी दारू चा व्यवसाय ही आजच्या परिस्थितीमध्ये समाजाला लागलेली एक कीड आहे. यावर प्रशासनाने त्वरित निर्बंध आणावा, मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या बेजबाबदारांकडून शासन पाचशे रुपये दंड आकारतो आता परजिल्ह्यातून जिल्ह्यामध्ये दारूचा पुरवठा होत आहे, यावर किंवा यातून रुग्णांची संख्या व त्याचे कुटुंब उध्वस्त होत नाही कां? याचा विचार प्रशासनाने अवश्य करायला हवा.


साहेब, "ते रेकार्डवर असलेले दारू विक्रेते?" सध्या काय करित आहे?


चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाल्यानंतर करोडो रूपयांची दारू नष्ट करण्यात आली आहे व हजारोच्या संख्येने दारू विक्रेत्यांना जिल्हा पोलिसांनी जेरबंद केले आहेत, याची अधिकृत माहिती जिल्हा पोलिसांनी मिडीयाला दिली आहे. सध्या रेकार्डवर असलेले हे दारू विक्रेते शासन निर्देशांचे पालन करीत आपापल्या घरीच बसले आहेत कां? की गरजू लोकांना "सॅनिटायझर व मॉस्क चे वितरण" करीत आहेत, या मुद्यावर संशोधन व चौकशी व्हायला हवी. शेजारीपाजारी जर दारू विक्री होत असेल तर त्यांना या दारूच्या पुरवठा फुल होत आहे याची चौकशी ही व्हायलाच हवी. वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी हे रुग्णांना स्वतः:चा जिव धोक्यात घालून आरोग्य सेवा देत आहे, पोलीस कर्मचारी हे विनाकारण फिरणार यांना ताकीद देत आहेत, सामान्य नागरिक शासन निर्देशांची काटेकोरपणे पालन करीत आहेत, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला मिडीया हा सुद्धा जिव धोक्यात टाकून आपले कार्य बजावित आहे, मग शहरात-जिल्ह्यात दारूचा पुरवठा कसा काय होतं आहे, हा विषय गंभीर आहे. शासन निर्देशांना धाब्यावर बसवून शहरात जिल्ह्यात दारू पुरवठा करणारे हे काही नवे आलेले नाहीत ते जुनेच आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी सर्वप्रथम हेच कार्य करायला हवे. म्हणूनचं साहेब, "ते रेकार्डवर असलेले दारू विक्रेते?" सध्या काय करित आहे? असा प्रश्न विचारावासा वाटतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies