चंद्रपूर :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला असताना चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभार रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन अभावी कोरोना बाधितांना जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन साठी कोरोना बाधितच्या नातेवाईकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. अशातच चंद्रपूर मध्ये चार महिन्यापूर्वी 20 हजार लिटर क्षमतेचे दोन ऑक्सीजन प्रकल्प मंजूर झाले यातील एक परवानगी न मिळाल्यामुळे थंड बस्त्यात गेला आहे. तर दुसरा पूर्ण समतेचे कार्यन्वित होऊ शकलं नाही त्यामुळे जवळपास 500 बीड ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत आहे जिल्ह्यात आता दररोज हजारोच्या वरती कोरोनाच्या विस्पोट होत आहे कोरणा रुग्णांची संख्या आणि उपलब्ध यंत्रणा याच्या कुठेच ताळमेळ नाही आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. मृतांचा आकडा दररोज वाढत आहे या स्थितीला प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणा कारणीभूत ठरत आहे. जिल्ह्यात कोरूना च्या पहिल्या लाटेत रुग्ण संख्या तुलनेने कमी असतानाही आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले त्यावेळी संभाव्य दुसरी लाट गृहीत धरून प्रशासनाने नियोजन केले त्याअंतर्गत ऑक्टोंबर मध्ये प्रत्येकी 20 हजार लिटरचे दोन ऑक्सीजन प्रकल्पला मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयातील 590 बेडला ऑक्सिजन पोहोचविण्यात येणार होते चार आठवड्यात हे प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होते. मात्र पाच महिन्याच्या कालावधी लोटून सुद्धा हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. ऑक्सिजन प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्टदार आर्क्टिक इन्फ्राटेक सोल्यूशन या कंपनीला दिले. ऑक्सिजन पुरविण्याचे काम नागपुरातील आदित्य एअर प्रॉडक्ट या कंपनीला देण्यात आले. याकरिता 2 कोटी 38 लाख 15 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला.
5 ऑक्टोबर 2020 रोजी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला प्लांट सुरू होणे अपेक्षित होते. मात्र आज चार महिन्यांहून अधिक काळ लोटूनही ऑक्सिजन यंत्रणा अजून सुरू झाली नाही. हे दोन्ही प्रकल्प शोभेची वास्तू ठरले आहेत. रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजन बेड्सचा ताळमेळ कुठेच जुळत नाही. कोरोना बाधितांचा ऑक्सिजनची पातळी घसरली तर त्याला त्वरित त्याचा पुरवठा आवश्यक असतो. एका दिवसाचा उशीर झाला तरी रुग्ण व्हेंटिलेटरवर पोहोचतो. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढत आहे.
हे दोन्ही ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित असते तर अनेकांचे जीव वाचले असते. शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प काही परवानगी अभावी सुरू होऊ शकला नाही. वैद्यकीय महाविद्यालयातील सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने यांनी सांगितले. येथील प्रकल्पात ऑक्सिजन उपलब्ध आहे. परंतु बेड्सपर्यंत पाइप जोडण्या झाल्या नाही, असे वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी सांगितले.