वरोरा :- तालुक्यातील खेमजई येथे सख्ख्या पुतण्याने सख्ख्या काकांचा काठीने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून हा खून दारूच्या नशेत असलेल्या काकांच्या भांडणामुळे झाल्याचे समोर आले आहे.
मृतक कवडू जितरु दडमल वय 70 वर्षे हा दारू पिऊन रोज वाद करायचा काल रात्री 8 च्या दरम्यान आरोपी यशवंत भाऊराव दडमल वय 30 वर्षे याचा व काकांचा वाद झाला.
मृतक कवडू जितरु दडमल वय 70 वर्षे हा दारू पिऊन रोज वाद करायचा काल रात्री 8 च्या दरम्यान आरोपी यशवंत भाऊराव दडमल वय 30 वर्षे याचा व काकांचा वाद झाला.
आरोपी यशवंतचा राग अनावर झाल्याने रागाच्या भरात त्याने काठीने आपल्या काका कवडूवर वार केला असता कवडू गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारा करिता दवाखान्यात नेले असता डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले आरोपी यशवंत दडमल वर कलम 302 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला .पुढील तपास शेगावचे ठाणेदार सुधीर बोरकुटे करीत आहे.