वरोरा येथील किशोर नरहरशेट्टीवार असे या रुग्णाचे नाव आहे. ते करोना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना वरोरा आणि चंद्रपूर शहरात बेड मिळाला नाही. त्यानंतर रुग्णवाहिकेने ते थेट तेलंगणा राज्यात गेले. मात्र तिथेही बेड न मिळाल्याने ते पुन्हा चंद्रपुरात परतले. या सर्व खटाटोपात 20 तासांपेक्षा जास्त वेळ निघून गेला.अखेर या सर्व क्लेशदायक प्रवासानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. गेल्या 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी 1235 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 13 मृत्यू झाले असून सक्रिय बाधितांची संख्या 7439 एवढी झाली आहे.
करोनाबाधित रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर असा क्लेशदायक प्रवास
एप्रिल १४, २०२१
0
Tags