चंद्रपूर : भाजपचे नेते तथा मा अर्थ व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. हे सरकार 'अलीबाबा चालीस चोर' च्या धर्तीवर' गृहमंत्री आणि सचिन वाझे' असे प्रकरण असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. मुनगंटीवार चंद्रपूर येथे बोलत होते.मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनिमित्त सीबीआयने सरकारमधील अशी सर्व घाण खणून काढली पाहिजे. विधीमंडळात वाझे विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप लढत असताना अनिल देशमुख आणि अनिल परब या मंत्र्यांनी त्यांचा बचाव करत अकलेचे तारे तोडले होते.वाझेच्या आरोपाची सीबीआयने संपूर्ण चौकशी करत प्रकरणातील अन्य नावे जनतेच्या दरबारात खुली करावी.