(चंद्रपूर / प्रतिनिधी)
ब्रेक द चेन च्या नियमावलीत बदल करून आजपासून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्याची परवानगी दिल्यानंतर आज सकाळी चंद्रपुर शहरातील बाजारपेठेत गर्दी झाली. चंद्रपुर जिल्ह्यात गेले 5 दिवस अत्यावश्यक सेवेवरही निर्बंध होते त्यामुळे ही सर्व दुकाने 5 दिवसानंतर उघडली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रूग्ण सापडू लागल्याने आणि मृत्यूची संख्याही वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील व्यापारी संघ व चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याशी चर्चा करून 21 एप्रिल पासून जिल्ह्यात जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय घेतला होता . त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. आज सकाळी 7 वाजल्यापासून दुकाने उघडण्यास सुरूवात केल्यानंतर बाजारात गर्दी झाली. भाजीपाला, किराणा खरेदी झाली होती. 11 वाजल्यानंतर पोलिसांनी व मनपाने हस्तक्षेप करत दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या.दुकाने बंद होताच हळूहळू गर्दी ओसरली.