वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील खदानीत दुर्घटनेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान गोवरी ओपनकास्ट खाणीत आर.सी. ऑफिस मध्ये एक डम्पर ओवर रेस होऊन घुसले. यात चार वेकोलि कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सामोर आली आहे. आर.सी. ऑफिस सामोर पार्किंग गार्ड मध्ये उभे असलेले एक डम्पर अचानक ओवर रेस होऊन ऑफिस मध्ये घुसले. यात जयप्रकाश महतो, कौशलेंद्र प्रसाद, मनीष साखरे व प्रभाकर चन्ने हे चार वेकोलि जखमी झाले आहेत. तिथे उपस्थित अन्य कामगारांच्या साहाय्याने तात्काळ जखमींना बाहेर काढून क्षेत्रीय रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खान प्रबंधक, क्षेत्रीय प्रबंधक यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. डम्पर ओवर रेस होऊन ऑफिस मध्ये कसे घुसले हे चौकशी झाल्यावरच कळेल.