बरांज ग्रामवासियांचा प्रशासनाविरोधात एल्गार !
पोलिसांची ग्रामस्थांवर कारवाई !
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील बरांज येथिल कोळसा खाण १ एप्रिल २०१५ पासून बंद पडली होती आता नुकतीच कर्नाटक खान सुरूवात करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षापासून या खाणीमध्ये जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त हे अन्यायाच्या विरोधात लढा देत आहेत, परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. कर्नाटक एम्टा खाण सुरू झाल्यानंतर बरांज गावातून जड वाहनांची वाहतुक केली जात आहे महत्त्वाचे म्हणजे ग्रामसभेची यासाठी परवानगी घेतली नाही बरांज वासी यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही तसेच प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न अद्यापही खोळंबलेला आहे, या मुद्द्यांवर आज (दि. १७) बरांज वासियांनी जड वाहनांची वाहतूक रोखली व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी नरेंद्र जीवतोडे यांनी तहसील ऑफिस च्या झाडावर चढून गळ्यात फासा टाकलेला आहे व एक पेट्रोलची बॉटल आणि माचिस घेऊन आत्मदहनाचा आत्महत्येचा हेतूने चढलेले आहे, यामुळे प्रशासनामध्ये खळबळ माजली असून यासंदर्भात बोलताना पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे यांनी पोरान बासी अन्वर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हा लढा असून तो न्याय मिळेल पावेतो कायम राहील असे सांगितले. हाती आलेल्या सूत्रानुसार भद्रावती पोलिसांनी बर आणि वासियांना भद्रावती पोलीस स्टेशनला बोलविले असल्याचे कळते.
कर्नाटक एम्टा पॉवर कार्पोरेशनच्या वतीने भद्रावती नजीकच्या बरांज गावाच्या शिवारात कोळसा खाण हलविण्यात येत होती. सदर कोळसा खाण १ एप्रिल २०१५ पासून कंपनीने बंद केली. त्यामुळे या खाणीत कार्यरत ४६८ कामगारांचे वेतन मागील तीन वर्षांपासून थकीत आहे. कामगारांना स्थायी नोकरी देण्यात यावी, कर्नाटका एम्टा कंपनीच्या वतीने बरांज व चेक बरांज गावाचे पूनर्वसन व बरांज गावातील पडलेल्या घरांचा मोबदला ग्रामपंचायत रेकार्ड गाव नमुना आठ नुसार देण्यात यावा, सुरक्षा रक्षकाचे थकीत व चालू वेतन देण्यात यावे, उर्वरीत जमीन संपादीत करण्यात यावी व काही संपादीत केलेल्या जमीनीचा पूर्ण मोबदला देण्यात यावा, कोळसा ट्रान्सपोर्ट व्यवसायीकांचे थकीत देयके अदा करण्यात यावे, कंत्राटदारांचे थकीत देयके देण्यात यावे, आदी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बंद असलेल्या कोळसा खाणीत कुठलेही काम कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडने करु नये, या संदर्भात मागील वर्षी खासदार बाळु भाऊ धानोरकर यांनी आंदोलन केले होते.