जिल्हा प्रशासनाच्या चाचणी करण्याच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, पण...!
नागरिक करतात सकाळ पासून प्रतीक्षा......!
चंद्रपूर : कोरोनाच्या चाचणीसाठी नागरिकांनी स्वतःहून समोर यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केल्यानंतर महानगरपालिका हद्दीमध्ये चाचणी सेंटर उघडण्यात आले आहे. नागरिकांनी या RTPCR चाचणी सेंटर मध्ये शासनाच्या निर्देशाला व स्वतःची जबाबदारी समजून चाचणी करण्याचे आव्हान स्वीकारले आहे परंतु चाचणी सेंटरमध्ये यरप कर्मचाऱ्यांची उदासीनता व वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. फक्त 100 चाचणी होतील, असे जेव्हा एखाद्या चाचणी सेंटर मध्ये सांगितले जाते, त्यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता समोर येते. "कागदोपत्री आणखीन काही आणि कृती मध्ये वेगळे काही" अशी स्थिती आज जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या हजारोच्या घरात निघत आहे. प्रशासनाद्वारे नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका व कोरोना टेस्ट करावे, अशी हाक प्रशासनाद्वारे दिली जात आहे. या हाके ला चंद्रपूरकरांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे, चंद्रपूरकर कसलीही घाई न करता कोरोना टेस्ट करण्यासाठी पुढे येत आहे परंतु महानगरपालिकेचे व प्रशासनाचे नियोजनशून्य कामामुळे काही लोकांना चाचणी केंद्रात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चंद्रपूरातील वन अकॅडमी येथे चालू असलेल्या RTPCR टेस्टिंग केंद्रावर ही हीच परिस्थिती आहे. फक्त 100 येथील "फतवा" आहे, हा फतवा कुणी काढला याबद्दल कुणालाही काही कल्पना नाही. 100 चाचणी झाल्यानंतर बाकींना परत जावे लागत आहे तर काही नागरिक आपला नंबर लागावा म्हणून सकाळी सात वाजल्यापासून वन अकादमीमध्ये मोठी गर्दी करत आहे. महानगरपालिकेतर्फे फक्त 100 RTPCR टेस्ट करण्याचे आदेश आहे असे तिथले कर्मचारी सांगत आहे. आज दुपारला बाराच्या सुमारास केंद्राची पाहणी केली सकाळपासून ज्यांनी नंबर लावले आहेत. त्यांच्या चाचणीला 12 वाजल्यानंतर सुद्धा सुरूवात झालेली नव्हती. हा एवढा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभार आहे.
यासंदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना विचारणा करण्यात आली असता आयुक्तांनी माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले तर महानगरपालिकेच्या महापौर यांना कॉल करण्यात आला असता त्या not reachable होत्या.
सगळीकडे कोरोना चे सावट आहे. सगळ्या रुग्णांवर अत्यंत गांभीर्याची परिस्थिती ओढावली आहे. त्यांना उपचाराची गरज असताना सुद्धा वेळेवर उपचार मिळत नाहीत, कोविड सेंटर मध्ये टेस्ट करायला गेल्यास शंभर व्यक्तींनाच रोज घेण्याची परवानगी आहे असे सांगण्यात येते आणि नागरिक त्या ठिकाणी 7.30 वाजता पासून गर्दी करून बसतात. परंतु त्यांची चाचणी 1 वाजला तरी सुरू होत नाही यामुळे नागरिकांना कडाडत्या उन्हात प्रकृती जपत त्रास सहन करावा लागतो व त्यानंतर 100 रुग्ण झाले की उरलेल्या लोकांना घरी परत पाठवले जाते अशा परिस्थितीत उरलेल्या नागरिकांनी करायचे तरी काय ? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे आजच्या परिस्थितीमध्ये वाढत्या कोणाच्या प्रसारामुळे कोरोना चाचणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे आणि कोविड टेस्ट सेंटरमध्ये रुग्णांना परत पाठवण्यात येते. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लवकरात लवकर अविलंब कोरोनाच्या चाचण्या करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.