Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन

दुःखद बातमी

चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री संजयबाबू देवतळे, यांचे आत्ता नागपूर येथे उपचारा दरम्यान नागपूर येथे कोरोनाने निधन

माजी मंत्री संजय देवतळे यांचे दु:खद निधन !

वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे आज नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 58 वर्षाचे होते. मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून ते आजारी होते त्यांना नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात सांस्कृतिक मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. अत्यंत मृदू स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून संजय देवतळे यांची ओळख होती. त्यांच्या मृत्युने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार


राज्‍याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्‍या निधनाने शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्‍याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. संजय देवतळे यांच्‍या निधनाची बातमी धक्‍कादायक असुन या बातमीवर विश्‍वासच बसत नाही. विधानसभा सदस्‍य म्‍हणुन त्‍यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न विधानसभाग़हात मांडणारा अभ्‍यासु लोकप्रतिनिधी म्‍हणुन त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री म्‍हणुन त्‍यांनी उत्‍तम कामगिरी बजावली. त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्‍वर त्‍यांच्‍या कुटुंबियांना या दु’खातुन सावरण्‍याचे बळ देवो असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.


संजयबाबूंच्या निधनाने वरोरा- भद्रावती मतदार संघाची हानी :- खासदार बाळू धानोरकर

             ज्येष्ठ नेते रामचंद्र उपाख्य दादासाहेब देवतळे यांचा वारसा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निस्वार्थपणे सांभाळणारे माजी मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. संजयबाबू देवतळे यांच्या निधनाने वरोरा-भद्रावती मतदार संघाची हानी झाली आहे, अशा शोकभावना चंद्रपूर- वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली. 
            संजयबाबू देवतळे यांनी वरोरा-भद्रावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्याच मतदार संघात सेवा करण्याची संधी मलाही आमदारकीच्या रूपात मिळाली. आज त्याच्या विकासाचा रथ आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, अतिशय शांत, संयमी लोकप्रतिनिधी कायमचा हरवल्याने वरोरा-भद्रावती मतदार संघाची हानी झाली आहे. मी २००९ मध्ये पहिल्यांदा त्यांच्याच विरोधात विधानसभा लढली. मी तेव्हा हरलो. मात्र, संजयबाबू जिंकल्याचा तितकाच आनंद होता. कारण ते मंत्री होऊ शकले आणि वरोरा- भद्रावती मतदार संघाचे नावलौकिक केले. हा मनातील आनंद मी त्यांना भ्रमणध्वनीवर विजयी शुभेच्छा देताना बोलून दाखविला होता. पक्षीय मतभेद विसरून कामे करणारा नेता आपल्याला सोडून गेल्याचे दुःख आहे.
              त्यांच्या आत्म्याला शांती लाभो व या क्षेत्रातील त्यांच्यावर प्रेम करणा-या जनतेला या दुखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना...!शोकसंवेदना
                शांत सुस्वभावी, संयमी राजकारणी, साधे सरळ व्यक्तिमत्व, माजी पालकमंत्री, माजी राज्यमंत्री, माजी आमदार संजयबाबु देवतळे यांचे अकस्मात आपल्यातून निघून जाणे हे वरोरा विधानसभा क्षेत्रासाठीच नाही तर राज्यासाठी एक अपिरीमित हानी आहे. राजकारणात अशी सरळमार्गी व साधी माणसं आता फार कमी राहीली आहे. 
             मी जेव्हा आमदार म्हणुन निवडू आली, तेव्हा संजयबाबुंचा मला कॉल आला व वरोरा विधानसभेच्या प्रथम महिला आमदार म्हणुन शुभेच्छा दिल्या. तसेच या क्षेत्राच्या लवकरच प्रथम महिला मंत्री व्हाव्या, असा आशीर्वादही दिला. ते शब्द आजही मला भावूक करतात.
             ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो व त्यांच्या आप्तपरीवारास तथा त्यांच्यावर प्रेम करणा-या तमाम जनतेला दुखा:तून सावरण्याचे बळ मिळो, हिच प्रार्थना.

- आमदार सौ. प्रतिभा धानोरकर
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र,
वरोरा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies