चंद्रपूर विशेष : कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यात कालपासून संचारबंदी लागू केली आहे. चंद्रपुरात मात्र ही संचारबंदी कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
काल रात्री ८ नंतर संचारबंदीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर MH34 UPDATED NEWS ने आज पहिल्या दिवशी चंद्रपुरातील प्रमुख रस्ते आणि चौक यांची पाहणी केली. अत्यंत संतापजनक चित्र पाहणीतून दिसून आले आहे. महाराष्ट्रात रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे.तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दररोज कोरोना बाधितांचे आकडे हजाराचा वर निघत आहे तर मृत्यूच्या संख्येत सुद्धा वाढ होत आहे. तरीही चंद्रपुरातील नागरिक काही ना काही कारणाने बाहेर पडत असलेले पहायला मिळाले. शहरातील बंगाली कॅम चौक, तुकूम परिसर , बस स्टॉप समोरील रस्ते, गांधी चौक अशा मुख्य रस्त्यांवर व चौकात सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे. बाहेर येणारे नागरिक हे अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत कां नाही हे ओळखणेही कठीण आहे.
सरकारकडून सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर दुकाने बंद आहेत. मात्र नागरिक नोकरी आणि काही कामांसाठी बाहेर पडले आहेत असं त्यांनी गाड्यांवर लावलेल्या स्टिकर्स आणि बोर्ड वरुन दिसत होतं.
चौकांमध्ये बॅरिकेड्स पण पोलीस नाही.....!
शहरातील काही चौक आणि रस्त्यांवर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. पण त्याठिकाणी पोलीस नसल्याचे चित्र दिसून आले आहे. काही ठिकाणी पोलीस असूनही नागरिकांना अजिबात थांबवले जात नाही.
शासनाचे संचारबंदी चे निर्देश "डोक्या"बाहेरचे...!
संचारबंदी संवंधात शासनाने दिलेले निर्देश हे सामान्य जनतेच्या अधिकाऱ्यांच्या "डोक्या"च्या बाहेरच्या असलेल्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. शासन निर्देशांत अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यात आले आहे. हॉटेल बंद पार्सल सुरू, प्रवास बंद पण ऑटो सुरू, जीवनावश्यक वस्तूंची विक्री होईल तर त्यांना खरेदी करणारे लोकं रस्त्यावर उतरतीलचं. शासन निर्देश भांबावणारे आहेत. काय सुरु काय बंद याचे स्पष्ट निर्देश कुठे नसल्यामुळे अधिकारी वर्ग मोठ्या पेचात पडला आहे. प्रवास बंद मग ऑटो सुरू कशाला? जीवनावश्यक सेवा देणारे अनेक वर्गात मोडतात त्यांच्या संबंधातील स्पष्ट आदेश शासन देशात नसल्यामुळे असमंजस्याची स्थिती संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूरातही बघायला मिळत आहे. असमंजस निर्माण करणाऱ्या या शासन निर्णयामुळे अधिकारी वर्गासोबत पोलिस विभागही "हतबल" झालेला आज पहिल्याच दिवशी बघायला मिळाला.