चंद्रपूर 17 एप्रिल : कोरोनावर मात करण्यासाठी सध्या एकमेव पर्याय लस घेणे आवश्यक असून त्याबाबत प्रशासन वारंवार आवाहन करीत आहे. पण पुन्हा एकदा शहरासह जिल्ह्यात कोव्हीशिल्ड लस संपली असून लसीकरण ठप्प झाले आहे. परिणामी केंद्रावर गेलेल्या नागरिकांना ताटकळत उभे राहिल्यावर देखील लस मिळत नसून ज्येष्ठ नागरिकांची परवड झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, आता सारा भर कोव्हॅक्सिनवर आहे. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून करोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन करीत आहे.पण पुन्हा एकदा दुसऱ्यांदा शहरासह जिल्ह्यात कोव्हीशिल्ड लस संपली असून लसीकरण ठप्प झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी लस केंद्रावर गेलेल्या नागरिकांना ताटकळत उभे राहिल्यावर देखील लस मिळाली नाही. त्याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना देखील बसला.
जिल्ह्यात कोव्हीशिल्ड ही लस पूर्णपणे संपल्याने आता सारा भर कोव्हॅक्सिनवर आहे. यामुळे कोव्हीशिल्ड लसीकरण पुढील पुरवठ्यावर अवलंबून राहणार आहे. चंद्रपूर शहरात तर शुक्रवारी सर्वच केंद्रांवर जवळपास लस संपली होती. प्रशासनाच्या आवाहनाला लोक प्रतिसाद देत असल्याचे चित्र सर्वत्रच दिसत आहे. पण त्यांच्या पदरी केंद्रावर गेल्यावर घोर निराशा पडली. मोठ्या उत्साहाने येथील ज्येष्ठांसह येथील नागरिक केंद्रावर गेले होते. काहींना तीन वेळा दुसऱ्या लसेसाठी शासकीय व खाजगी केंद्रावर जावे लागले. पण तरी देखील लस मिळाली नाही.
१ लाख ७२ हजार ४५५ लसीकरणाचे डोज : १४ एप्रिल अखेर १ लाख ७२ हजार ४५५ लसीकरणाचे डोज देण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण ९८ केंद्र चालत आहेत. त्यात सध्या जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वेकोलिचे लालपेठ क्षेत्रीय रुग्णालय या केवळ २ केंद्रांवरच कोव्हॅक्सिन लसीकरण केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.