राजुरा:- तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती धोपटाला वसाहती जवळील एका चबुतऱ्यावर सायंकाळी गप्पागोष्टी करीत खर्राचे सेवन करणाऱ्या सहा मित्रांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे कोरोना काळात काळजी न घेणार्या या सर्व मित्रांच्या हे चांगलेच अंगलट खाणारे आले आहे . वेकोलिच्या सास्ती धोपटाला या कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीजवळ आयटक व बीएमएम या कामगार संघटनांचे कार्यालय आहे .या समोरच रस्त्याचे बाजूला एक सीमेंटचा चबुतरा आहे . खाणीतील काम संपल्यावर सायंकाळी या चबुतर्यावर येऊन गप्पागोष्टी करीत टाईमपास करणेहा या वसाहतीत राहणाऱ्या सहा कामगार मित्रांचा छंद होता . हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यातही यात खंड पडला नाही अर्थात या चर्चेचे वेळी काहींना खरा व तंबाखू खाण्याचा छंद होता . या गोष्टी एकमेकांना आग्रह करून भरविण्यात त्यांना मित्रत्वाचा खरा अनुभव येत असावा पण नूकताच यापैकी एकाला ताप आला आणि त्याने कोरोना तपासणी केली तेव्हा त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान झाले . यानंतर या सर्वच मित्रांनी कोरोना तपासणी करण्याचे याच चबुतऱ्यावर ठरविले . तपासणी नंतर सर्वच सहाही मित्र पॉझिटिव्ह आले . यापैकी एकाला चंद्रपूरला बेड न मिळाल्याने त्याला अमरावतीला पाठविण्यात आले आहे .