Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

बल्‍लारपूरात कोविड हॉस्‍पीटल उभारण्‍यासाठी बल्‍लारपूर मेडिकल असोसिएशनने पुढाकार घ्‍यावा – आ. सुधीर मुनगंटीवार





आ. मुनगंटीवार यांनी साधला बल्‍लारपूरातील डॉक्‍टरांशी संवाद


जनजागरण व आरटीपीसीआर चाचणी केंद्र उपलब्‍ध करण्‍याला प्राधान्‍य


कोरोना महामारीच्‍या या संकटाचा सामना एकत्रीतपणे करत बल्‍लारपूर शहराला कोविड फ्री करण्‍याच्‍या द़ष्‍टीने बल्‍लारपूर शहरातील डॉक्‍टर्सनी बल्‍लारपूर मेडीकल असोसिएशनच्‍या माध्‍यमातुन पुढाकार घ्‍यावा असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्‍लारपूर शहरातील खंडेलवाल यांच्‍या होस्‍टेलमध्‍ये कोविड हॉस्‍पीटल उभारण्‍यासाठी बल्‍लारपूर मेडीकल असोसिएशनने पुढाकार घ्‍यावा, त्‍यासाठी शासन मान्‍यतेसाठी आपण सहकार्य करू याबाबत आ. मुनगंटीवार यांनी आश्‍वस्‍त केले.

दि. 17 एप्रील रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर शहरातील डॉक्‍टर्सशी झुम मिटींग द्वारे संवाद साधला व कोरोना प्रतिबंबधक उपाययोजनांबाबत विस्तारपूर्वक चर्चा केली. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, बल्‍लारपूर शहरात आरटीपीसीआर चाचणी केंद्र उघडुन त्‍यामाध्‍यमातुन 24 तासाच्‍या आत शासनमान्‍य लॅबच्‍या माध्‍यमातुन रिपोर्ट मिळेल अशी व्‍यवस्‍था आपण करणार आहोत. त्‍याचप्रमाणे नागरिकांमध्‍ये यासंदर्भात जनजागृती करण्‍याबाबत बल्‍लारपूर मेडीकल असोसिएशनने पुढाकार घ्‍यावा व बल्‍लारपूर नगर परिषदेने सुध्‍दा जनजागृतीच्‍या प्रक्रियेमध्‍ये सहकार्य करावे असे सुध्‍दा त्‍यांनी यावेळी सुचविले.

लसीकरणामध्‍ये चंद्रपूर जिल्‍हा अग्रेसर ठरावा या द़ष्‍टीने आपण प्रयत्‍नशील असुन याबाबत केंद्रीय आरोग्‍य मंत्री, श्री. नितीनजी गडकरी यांचेशी आपण याबाबत सतत संपर्कात आहोत. याआधी सुध्‍दा आपण बल्‍लारपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन्‍स उपलब्‍ध केल्‍या आहेत. आता बल्‍लारपूर शहरात 1 लाख मास्‍क वितरीत करण्‍याचे नियोजन आपण केले आहे. बल्‍लारपूर शहरात 100 टक्‍के लसीकरण करण्‍याच्‍या द़ष्‍टीने आपण प्रयत्‍नशील असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.
जनजागरणासह पायाभूत सुविधा वाढविण्‍यावर भर देण्‍याची आवश्‍यकता आ. मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली. चंद्रपूर शहरात वाढत्‍या रूग्‍णसंख्‍येमुळे आरोग्‍य व्‍यवस्‍थेवर ताण येत असल्‍यामुळे बल्‍लारपूर शहरात कोविड हॉस्‍पीटल उभारण्‍याची आवश्‍यकता आहे. आदिलाबाद, करीमनगर, आसिफाबाद येथील हॉस्‍पीटल चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिकांसाठी उपलब्‍ध व्‍हावे अशी मागणी आपण राज्‍य सरकारकडे केली मात्र राज्‍य सरकारने सामंजस्‍य करार न केल्‍याने यात अडचण निर्माण झाल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. प्रामुख्‍याने बल्‍लारपूर शहरात आरटीपीसीआर चाचणी केंद्र तयार करण्‍याबाबत नगर परिषदेने जागा उपलब्‍ध करावी अशी सुचना आ. मुनगंटीवार यांनी केली. कोरोनाचे हे संकट किती काळात संपेल असे सांगता येणार नाही त्‍यामुळे करण्‍यात येणा-या उपाययोजना दिर्घकालीन असाव्‍या यावर त्‍यांनी विशेष भर दिला.

यावेळी डॉ. सत्‍यनारायण, डॉ. विजय बोनगीरवार, डॉ. मानवटकर, डॉ. सुनिल कुल्‍दीवार, डॉ. सतिश बंडावार, अजय दुबे, रमेश समसनवार, डॉ. बानोत आदींनी उपाय सूचवत उपाययोजनांच्‍या अनुषंगाने सुचना केल्‍या. बैठकीचे प्रास्‍ताविक नगराध्‍यक्ष हरिश शर्मा यांनी केले. बैठकीला डॉ. क्षमा बोधे, डॉ. श्‍याम हिवरकर, डॉ. पुरी, डॉ. जी. सी. राठी, डॉ. तुंबडे, मनिष चंदे, डॉ. प्रिया ढाने आदी डॉक्‍टरांची उपस्‍थीती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies