चंद्रपूरमध्ये असलेल्या कोळसा खाणी आणि उद्योग यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट तयार झाल्यामुळे देखील या तापमान वाढीला हातभार लागत आहे आणि तापमानात मोठी वाढ होत आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उकाड्याची झळ बसत आहे. दरवर्षी चंद्रपूर येथे सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. तप्त उन्हामुळे नागरिक उष्माघाताला बळी पडू नये, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका पाचव्यांदा 'हीट ऍक्शन प्लॅन' राबविणार आहे. दिवसा वाढलेल्या तापमानाचा परिणाम रात्रीच्या तापमानावर देखील होत आहे. वाढत्या झळांमुळे आता रसवंती गृह आणि लिंबू सरबताच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.
उन्हाळ्यात अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे त्यांचं शरीर आतून हायड्रेट राहातं. उन्हाळ्यात लिंबू पाणी, ज्यूस, सरबत प्या. मुलांना उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायला लावा. कॉटनचे कपडे लगेच घाम शोषून घेतात. कॉटनचे कपडे शक्यतोवर हलक्या रंगांचेच असावेत.