कोळमडलेली आरोग्यव्यवस्था, आजाराची भिती व मृत्यूचा तांडव !
नैतिक जबाबदारी समजून निव्वळ घोषणांचा बाजार मांडणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सोशल मिडिया वर नागरिकांचा संताप होतोय व्यक्त !
चंद्रपूर : कोरोणाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली असून ऑक्सिजन, रूग्णालयात बेड, लसी, रेमेसेडीवर इंजेक्शन यांचा तुटवडा पसरला असुन उपचाराअभावी कोरोना बाधितांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. आज 18 एप्रिल रोजी ब्रह्मपुरी येथील एका 37 वर्षीय युवकाच्या ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे प्रवासी निवाऱ्यात मृत्यू झाला. चंद्रपूरचे पालकमंत्री नामदार वडेट्टीवार यांचा हा मतदारसंघ आहे. पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप आणि पुनर्वसन यासारखी अनेक महत्त्वाची मंत्रीपदे आहेत. मदत व पुनर्वसन सारख्या पदांवर राज्यांमध्ये ते कार्यरत आहेत परंतु जिल्ह्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आले आहे. त्यांच्या मतदारसंघाकडे त्यांनी कानाडोळा केला असून त्यांचे बस्तान हे नागपूर येथे असते असा आरोप ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात आता होऊ लागला आहे. रुग्णाला बेड न मिळाल्यामुळे प्रवासी निवाऱ्यात एका युवकाच्या झालेल्या मृत्यूने ब्रह्मपूरकरांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. सोशल मीडियावर वाऱ्यासारखी मृत पावलेल्या मृतकाच्या व त्याच्या कुटुंबियांच्या आकांताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमांवर निव्वळ घोषणांचा बाजार मांडणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या शब्दात नागरिकांचा उद्रेक बाहेर येत आहे.
जिल्ह्यामध्ये रोज दोन आकड्यांमध्ये मृतांची तर चार आकड्यांमध्ये बाधितांची संख्या येत आहे. मागील वर्षी जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने वड्डेट्टीवारांनी कोरोना नियंत्रणाबाबत अनेक घोषणा केल्या, दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केलीच नाहीत परंतु आरोग्य व्यवस्थेकडे पालकत्व असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळेचं आज चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना ची संख्या रोखण्यास त्यावर नियंत्रण आणण्यात आरोग्ययंत्रणा सपशेल फेल झाली आहे. जिल्ह्यातील दारूबंदी हटावी यासाठी ते जेवढे आक्रमक होते तेवढेच आक्रमक जर ते आरोग्य व्यवस्था सुधारावी, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व्हावी यासाठी प्रयत्नशील राहिले असते तर महाराष्ट्र राज्यामध्ये चंद्रपूर जिल्हा कोरोना वर नियंत्रण आणणारा "मॉडेल जिल्हा" म्हणून अवश्य ओळखला गेला असता असा आज सर्वसामान्यांमध्ये सूर आहे.
आज ब्रह्मपुरी येथे बेड उपलब्ध न झाल्याने एका 37 वर्षीय युवकाच्या प्रवासी निवार्या मध्ये मृत्यू झाला. ब्रह्मपुरी येथील रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांना भरती करण्यासाठी रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नाही आहे. कोरोना रुग्णांना बेडसाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद चौक येथे असलेल्या प्रवासी निवार्या मध्ये एका आज इसमाच्या उपचार न मिळाल्याने शकल्या मुळे व बेड उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून रुग्णांना बेड ऑक्सिजन लसीकरण रेमेसेडीअर इंजेक्शनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.
पालकमंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या !
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ असलेल्या ब्रह्मपुरीत आज वैद्यकीय उपचाराच्या अभावी एका 37 वर्षाच्या तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. स्वतःचा मतदारसंघ ज्या मंत्र्याला सांभाळता येत नाही तो जिल्हा आणि राज्य काय सांभाळणार?
ब्रह्मपुरी मतदारसंघात दारु, अवैध वाळू उपसा, आणि इतर अवैध धंदे सुरू ठेवायला पालकमंत्री वडेट्टीवारांकडे वेळ आहे. मात्र कोरोनाच्या महामारीत स्वतःच्या मतदारसंघातच आरोग्य व्यवस्था उभी करायला वेळ नाही. ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जनते प्रति तुम्हाला जरा जरी प्रेम, सहानुभूती असेल तर तात्काळ स्वतःच्या मंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा, उमलू लागले आहेत.