मूल:- लाॅकडाऊन असताना विनाकारणाने वारंवार बाहेर फिरणा-यांवर पायबंद घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड तपासणी करण्याची योजना आखली रविवारी सकाळी राबविलेल्या या मोहिमेत विनाकारण फिरणा-या 136 जाणांची अॅंटिजन चाचणी करण्यात आली. यात सहा जण बाधित आढळले. या मोहिमेमुळे विनाकारण फिरणा-या चांगलाच चाप बसला आहे. काही वेळातच मूल शहरात स्मशान शांतता निर्माण झाली. कोरेानाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने,प्रशासनाने लाॅकडाउन करण्याचा निर्णय घेतला. लाॅकडाउन सेवेसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मात्र,लोकांचे बाहेर पडणे थांबले नाही. त्यामूळे मूल तालुका प्रशासन,नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या विनाकारण बाहेर फिरणा-यांची अॅटीजन तपासणी करण्याची योजना आखली या मोहिमेत तसीलदार डाॅ.रवींन्द्र होळी,पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत,गटविकास अधिकारी डाॅ.मयूर कळसे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम,नायब तहसिलदार यशवंत पवार आदींनी गांधी चैक व परिसरातील रस्तावर नाकेबंदी केली. या अनुषंगाने 136 नागरिकांनी अडवून पत्रकार भवन येथे असलेल्या कोविड तपासणी केंद्रात चाचणी करण्यात आली.