Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जिल्ह्यात हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या माऊझर-सिक्सर’ या बंदुकांची सखोल चौकशी करण्यात यावी !





विदर्भ राज्य ग्रामीण व शहरी पत्रकार संघाची पोलिस महानिरीक्षकांकडे मागणी !


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांमध्ये माऊझर-सिक्सर’ ने हत्या करण्यात आल्या. कोळसा व्यापारी सुरज बहुरिया, कोळसा ट्रान्सपोर्ट व्यापारी राजु यादव यांची हत्या माऊझर-सिक्सर’ ने करण्यात आली. यातील आरोपींना अटक करून त्यांचेकडून माऊझर-सिक्सर’ हे हथियार ही जप्त करण्यात आलेत. परंतु पोलिस तपासात आरोपींकडून हे हथियार कुठून आणण्यात आले, त्याचे परवाने का वापरण्यात आले नाही ? याची चौकशी जिल्हा पोलिस विभागाकडून करण्यात आली नाही. नुकतीच ३१ जानेवारी २०२१ रोजी राजुरा येथील कोळसा ट्रान्सपोर्ट व्यापारी राजु यादव यांच्या हत्येमधील आरोपी चंदन शितलप्रताप सिंग व सत्येंद्रकुमार परमहंस सिंग या दोन आरोपींना अटक करण्यात आली. या हत्या प्रकरणात ही ‘माऊझरसिक्सर’ चा वापर करण्यात आला. आरोपींनी आपल्या बयानात हे माऊझर’ मृत व्यक्तींकडून घेतल्याची बयाणी दिली. तपास अधिकान्यांनी या ठिकाणी हत्यार खरेदी चे प्रकरण तपासबंद केले. महोदय, यापूर्वी ही बल्लारपूर येथील कोळसा व्यापारी सुरज बहुरिया यांची हत्या माऊझर-सिक्सर ने करण्यात आली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. परंतु त्यावेळी ही परवाना लागत असलेले हे हथियार कुठन खरेदी करण्यात आले ? बिना परवाना हे हथियार कसे बाळगण्यात येत आहे ? याची चौकशी करण्यात आली नाही. पोलिसांच्या या बेजबाबदारपणामुळेचं काही महिन्यानंतर राजु यादव यांची हत्या घडली. चंद्रपूर जिल्हा पोलिस ‘माऊझर-सिक्सर’ सारख्या हथियाराच्या अपराध्यांकडून वापरण्यात येणाऱ्या प्रकरणाला गांभीर्याने घेत नाही आहेत. यासंदर्भात नुकतेच पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसादयांचेकडे विदर्भ राज्य ग्रामीण व शहरी पत्रकार संघाने एका निवेदनाच्या माध्यमातुन परवाना नसतांना सर्रासपणे अपराध्यांकडून विना परवाना वापरण्यात येणाऱ्या या बंदुकांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री मा. नाम. अनिल देशमुख साहेब, मान. पोलिस महासंचालक साहेब, महाराष्ट्र राज्य,मुंबई तसेच मान. पोलिस अधिक्षक साहेब, चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर यांना ही देण्यात आल्या आहेत.

कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.



राजू यादव कुटुंबीयांची उपस्थितीत मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांची मागणी !

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध व्यवसायातून वाढलेली संघटित गुन्हेगारी ही चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसह सामाजिक आरोग्य बिघडवित असून राजुरा येथे दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी कोळसा ट्रान्सपोर्टर व्यवसायी यांची भरवस्तीत चंदन शितलप्रताप सिंग व सत्येंद्रकुमार परमहंस सिंग या आरोपींनी बंदुकीने गोळ्या घालून केलेली हत्या यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, राजू यादव हत्याकांड कटात सहभागी हत्या पवनी वेकोली माईन्स येथील कोळसा वाहतुकीच्या वादावरून झाली असून पोलिसांनी केवळ चंदन शितलप्रताप सिंग व सत्येंद्रकुमार परमहंस सिंग ह्या दोघानाच अटक केली असून या हत्याकांड कटात १) झुल्लूर पाठक, २)अनिल झाँ, ३) मनिश शर्मा, ४) मनोज शर्मा, ५ ) गुड टायरवाला है सुद्धा हत्येच्या कटात सहभागी असल्याची बाब राजु यादव यांच्या कुटुंबियांनी आपल्या पोलिस तक्रारीत नमुद केलेली आहे. परंतु पोलिसांनी या आरोपींना अटक केली नाही यावरून हे प्रकरण दडपल्या जात असल्याचा आरोप मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकड़े यांनी पत्रकार परिषदेत केला.

वेकोली कोळसा याहतुकीत आपली दादागिरी चालावी म्हणून संघटित गुन्हेगारी वेकोली क्षेत्रात वाढलेली आहे. व परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये बंदुका (माऊझर) आणून हत्या करण्याचे प्रकार वाढलेले आहे. यामध्ये बल्लारपूर येथे सुरज बहुरिया यांच्या झालेल्या खुनात वापरलेली बंदुक कुठून आणली याचा शोध पोलिसांनी घेतलेला नाही. शिवाय व राजु यादव यांचा झालेला खुन यामध्ये वापरण्यात आलेल्या बंदुका (माऊझर) हा मृत व्यक्तीकडून खरेदी केल्याचे आरोपीचे बयाण आहे. त्यामुळे परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येत असलेल्या बंदुका याचेवर पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेद्वारे लक्ष ठेवणेने गरजेचे आहे. जर सुरज बहुरिया यांच्या हत्येत वापरलेली बंदुक कुठून आणली याचा शोध लागला असता व बंदुका पुरवठा करणाऱ्या मोरक्याना पकडले असते तर राजू यादय यांना मारण्यासाठी बंदुक उपलब्ध नसती. कोळसा ट्रान्सपोर्ट व्यवसायी राजु यादव यांची हत्या संघटित गुन्हेगारीतून करण्यात आली मात्र या प्रकरणात केवळ दोन आरोपी पोलिसांनी पकडले पण यामधै एकुण सात आरोपी असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. राजु यादव यांच्या कुटुंबियांनी पोलिस बयाणात दिलेल्या कटात सहभागी आरोपींची नावे सांगितली त्यांना पोलिसांनी अटक केली नाही त्यामुळे त्यांच्यापासून राज यादव यांच्या कुटूंबियांच्या जिवाचा धोका निर्माण झालेला आहे. त्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण मिळणे आवश्यक आहे. राजु यादव यांची हत्या ही संघटित गुन्हेगारीमुळे झालेली असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू व्यवसाय, कोळसा-रेती तस्करी यामुळे ही संघटित गुन्हेगारी फोफावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरज बहुरिया राजू यादव, शुभम फुटाणे इल्यादींची हत्या कट रचून करण्यात आलेल्या संघटित गुन्हेगारीतून झालेल्या आहे. त्यामुळे राजू यादव प्रकरणात मुख्य आरोपीसह कटात सहभागी असणाऱ्या इतर आरोपीविरोधात म.को.का. अंतर्गत कारवाई करावी दरम्यान राजू यादव यांच्या परिवाराला धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील असे पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी म्हटले आहे दरम्यान चंद्रपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव यांच्या कुटुंबीयांना पोलीस सरक्षण देण्यात यावे अशी मागणी सुद्धा केली. यावेळी मनसे शहर संघटक मनोज तांबेकर, पियुष धूपे, मूतक राजू यादव यांचा मुलगा आशिष यादव पुतण्या संतोष यादव,दीपक यादव, सहकारी चंद्रभान यादय,सचिन मेहरोलीया इत्यादींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies