चंद्रपूर मूल मार्गावरील जानाळा जवळ एका दुचाकी वाहनाला ट्रकने धडक दिल्यांने दोन तरूणाचा जागीच मृत्यू झाला. मृतक दोनही युवक हे मारोडा येथील रहीवासी असल्यांची प्राथमिक माहिती असून, मृतकांचे नांव प्रदिप वसंत मानकर (35), व विनोद तुळशीराम मानकर (28) असे आहे.
चन्द्रपुर -मूल महाममार्गावर भीषण अपघात झाला यात मारोडा येथिल तिघांचा समावेश आहे. दोन जागीच ठार तर एक गंभीर जखमी आहे. मृतकांमध्ये प्रदीप मानकर , विनोद मानकर तर जखमी मध्ये गणेश वैरागडे यांचा समावेश आहे. पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तिघेही अजयपूर येथे मिस्त्री कामाला जात होते. परत येत असताना यांचा अपघात झाला.
मारोडाचे सहा युवक तीन दुचाकीवरून येत असतांना, दोन दुचाकी सुखरूप बाहेर निघाल्या मात्र प्रदिप व विनोदला काळानी हिरावून नेले. अपघात झाल्यानंतर, ट्रक चालक फरार झाला.