Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

समाजहिता सोबत देशहित जोपासा : देवराव भोंगळे
आवाळपूर :-
समाज एकत्रीत आणणे आणि समाज घडविणे ही मोठी बाब आहे. आधुनिक काळात समाज हा विस्कळीत होत चालला आहे त्याची मोट बांधने कठीण होत चालले आहे. त्यामुळे सुशिक्षित लोकांनी समोर येवून समाजाला शिक्षित करणे काळाची गरज बनली असून समाजहितासोबत देश हित जोपासले पाहिजे. असे प्रतिपादन देवराव भोंगळे यांनी नांदा फाटा येथील श्री संत नगाजी महाराज मूर्ती स्थापना दिवस सोहळयात व्यक्त केले.

पुढे ते बोलतांना म्हणाले की, नाभिक समाज हा अल्पसंख्य असला तरी समाजातील महत्त्वाचा दुवा आहे. युवकांना नेतृत्व करण्याची संधी आहे. त्यांनी त्या संधी चे सोने केले पाहिजे. आपण जन्माला आलो तर समाजाला काहीतरी देणं लागतं या उद्देशानेच आपण कार्य केले पाहिजे. यावेळी त्यांनी पक्षाच्या वतीने लॉकडाऊन काळात अनेक दिवस दुकाने बंद असल्यामुळे उपासमारीची पाळी आलेल्या गरजू दुकानदार व कारागीर बांधवांना केलेल्या मदतीचा तसेच मा.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सलून दुकान सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख सुद्धा केला. भविष्यात नाभिक समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले त्यासोबतच समजाचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी सुध्दा त्यांनी घेतली.

नांदा फाटा येथील श्री संत नगाजी महाराज मूर्ती स्थापना दिवस सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन देवरावजी भोंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर यांचे हस्ते संपन्न झाले तर अध्यक्षस्थानी हरीश ससनकर लेखक तथा राज्य सरचिटणीस पुरोगामी शिक्षक संघटना, तर प्रमुख उपस्थितीत पुरुषोत्तम आस्वले उपसरपंच नांदा, संजय मुसळे माजी सभापती कोरपना, पुरुषोत्तम निब्रड, रत्नाकर चटप हे होते.
यावेळी बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीश ससनकर यांनी दुर्लक्षित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या नाभिक समाजाला अन्य समाज व राज्यकर्त्यांनी वेळोवेळी मदत करण्याचे आवाहन केले.

यावेळी धिडशी येथील नवनिर्वाचित सरपंच कु. रीना हनुमंते, व दिल्ली येथील परेड मध्ये जिल्हाचे नेतृत्व करणारी कु. नाजुका कुसराम याचे मा.देवराव भाऊ भोंगळे यांचे हस्ते शाल श्रीफळ व नगाजी महाराज यांचा फोटो देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन नितीन शेंडे यानी केले तर प्रास्ताविक सतीश जमदाडे व आभार अखिल अतकारे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदा फाटा नाभिक समाज सदस्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies