लाच मागितल्याचे प्रकरण, दुर्गापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल !
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या खंडणीचे प्रकरणे उघडकीस येत आहे. विविध संघटनेच्या नावावर पदाचा गैरवापर करून खंडणीचे प्रकार जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. एखाद्या पक्षाचे संघटनेचे पद घ्यायचे व जबरन वसूली करायची हा सामाजिक मुखवटा घातलेल्यांच्या दुसरा चेहरा आहे. वेकोली मध्ये नोकरी करणारे व श्रीराम सेना आंतरराष्ट्रीय संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय यादव यांना खंडणी प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. श्रीराम सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय यादव हा त्यातीलच एक चेहरा आहे. अजय यादव यांना यापूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमात पुरस्कार पण देण्यात आले आहेत. एक बाजू वेगळी आणि दुसरी बाजू वेगळी अशी अजय यादव यांची जिल्ह्यामध्ये भूमिका आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेकोलीमध्ये नोकरीवर असलेले अजय यादव आपले कर्तव्य न बजावता रेती तस्कर, कोळसा तस्कर, गौ-तस्कर यांना आपल्या पदाचा गैरवापर करत व्यवसाय करीत असल्याचे आरोप आहेत.
हाती आलेल्या वृत्तानुसार, अशाच एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून 24 फेब्रुवारीला वसंता तोडासे सकाळी 7 वाजता आपल्या ट्रॅक्टरने विटा वाहतूक करीत असताना श्रीराम सेना आंतरराष्ट्रीय चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय यादव हे आपल्या स्कॉर्पिओ वाहन क्रमांक Mh34 am 9940 ने अचानक ट्रॅक्टर च्या समोर वाहन लावत ट्रॅक्टर चालकाला जीवनिशी मारण्याची धमकी देत तुझ्या मालकाला 5 हजार मागितले असता त्याने टाळाटाळ केली असे म्हणत त्या चालकाला अश्लील शब्दात शिवीगाळ करीत ट्रॅक्टर ची चावी व मोबाईल हिसकावला.
तोडासे यांनी याबाबत दुर्गापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आता दुर्गापूर पोलिसांनी भांदवी कलम 341, 385, 34 व 294 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अजय यादव यांना अटक केली. अजय यादव हे मागील काही महिन्यांपासून ट्रॅक्टर चालकांकडून अवैध पद्धतीने पैसे वसुली करायचे पैसे न दिल्यास त्यांना मारहाण करीत तू धंदा कसा करतोस ते बघतो म्हणत धमकी द्यायचे. अजय यादव हे वेकोली कर्मचारी असून ते कामावर न जाता वसुली करण्यात मग्न असायचे. श्रीराम सेना आंतरराष्ट्रीय चे वरीष्ठ पदाधिकारी यादव बद्दल काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
महत्त्वाचे म्हणजे श्रीराम सेना (आंतरराष्ट्रीय) यांची नुकतीच सभा झाली त्या सभेमध्ये जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याला मोठे पद देण्यात येऊन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले होते, परंतु त्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बाॉडीबद्दल अद्यापपावेतो कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर ही संशयाची सुई निर्माण होत आहे.