सकाळच्या सुमारास मुलगा रामा पेंदोर याने वडील मारोती पेंदोर यांच्याशी इंजापूर येथे भांडण केले. वडिलांना जीवे मारण्यासाठी तो हातात कुऱ्हाड घेऊन फिरत होता. दरम्यान, आसन खुर्द येथे येऊन मुलाने रागाच्या भरात वडिलांचे घर आग लावून पेटवून दिले.या आगीत घरातील सर्व वस्तू साहित्य भस्मसात झाले. घर गावापासून दूर असल्यामुळे आग इतरत्र पसरली नाही. आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी बोलविण्यात आली. पण तोपर्यंत घर जळून गेले होते.
सदर घटनेची तक्रार मिळाल्यानंतर गडचांदूरचे ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आरोपी हातात कुऱ्हाड घेऊन फिरत होता. दरम्यान त्याने उंदीर मारायचे केक खाल्याचे दिसून आले. लगेच दुपारी २ वाजता पोलिसांनी त्याला उपचारासाठी गडचांदूर येथे नेले.
आरोपी रामच्या भीतीने आई - वडील इंजापूर गाव सोडून आसन खुर्द येथे मागील दोन वर्षे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. तरीही तो मारहाण करत असल्याचे वडिलांनी सांगितले. दरम्यान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.