सिंदेवाही :- तालुक्यातील रत्नापूर या गावावरून नवरदेवाची वरात लग्न लावून एकारा येथून आपल्या गावी परत जात असताना कच्छेपार येथेरोड वरून मेटाडोर रोड खाली उतरल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी आहे.
सविस्तर वृत्त असे की, सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे नवरदेव व त्याचे सगेसोयरे रत्नापूर येथून वधू ला सोबत घेऊन जात असताना कच्छेपार या ठिकाणी मेटेडोअर पलटी झाल्याने पाच लोकांचा मृत्यू तर पंधरा जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जखमींना सिंदेवाही च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली असून वृत्त लिहिस्तोवर कोणतीही अधिकृत माहिती रुग्णालय प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाकडून प्रसारित करण्यात आली नाही.