विजय एका ध्येयवेड्या तरुणाचा

येरगाव ग्रामपंचायत सदस्य पदी पंकज गेडामया 23 वर्षीय तरुणाचा विजय

मुल :- येरगाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 3 मधून पंकज गेडामया सुशिक्षित ध्येयवेड्या तरुणाची ग्रामपंचायत सदस्य पदी विजय प्राप्त केला पंकजा हा चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालया मध्ये बॅचलर ऑफ आर्ट ही पदवी प्राप्त केली त्यानंतर त्याच महाविद्यालयांमध्ये पंकजने (MA English) मध्ये आपलं पूर्ण शिक्षण घेतले पंकजच्या मनात आनल असतं तर मोठ्या पगाराची नोकरी सहजरीत्या करू शकत होता परंतु गावात व गावासाठी काहीतरी करावं हे स्वप्न मनात घेऊन चंद्रपूर शहरावरून गावाकडे पंकज परतला आणि युवकांना सोबत घेऊन मिळेल त्याचे मार्गदर्शन घेऊन गावाच्या सामाजिक कार्यात त्यांनी भाग घेतला गावामध्ये विविध स्पर्धा व गावकर्‍यांचे मनोरंजन करण्यासाठी नाटक अशी अनेक कामकरीत त्यांनी आपल्या मागे युवकांची मोठी फोज तयार केली
आज त्याच ध्येयवेड्या पंकजाने एका बलाढ्य उमेदवाराला पराभव करीत गावातील युवा मित्रांना सोबत घेऊन वयाच्या २३ व्या वर्षी पंकजने येरगाव ग्रामपंचायत ची पहिली पायरी गाठली. पंकजचा चारही बाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पंकज गेडाम हा उच्चशिक्षित तरुण आपले विचार कशाप्रकारे कृतीत आनार आहे याकडे येरगांव ग्रामपंचायत च्या सर्व जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.

Post a comment

0 Comments