शेरज, कढोली, सांगोडा ग्रा.पं. शे.संघटनेची सत्ता
पिपरी, कोडशी ग्रा.पंचायातला शे.संघटना आघाडीवर
कोरपना तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. काही ग्रामपंचायतीसाठी भारतीय जनता पक्षाला उमेदवार देखील मिळाले नाही अशी परिस्थिती दिसते. शहरात येथे शेतकरी संघटनेने एक हाती सत्ता प्राप्त केली असून सांगोला येथे राणी सचिन बोंडे, बंडुजी भगत, प्रियंका प्रफुल रागीट हे तीन शेतकरी संघटनेचे उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. तसेच गणेश रामदास पायतडे हे कोडशी खुर्द ग्रामपंचायत मधून शेतकरी संघटनेचे अविरोध निवडून आले आहे. त्याचप्रमाणे कढोली खुर्द येथील श्री.डाॅ. विनोदरावजी डोहे,माजी सरपंच सौ.गिताताई जुनघरी,आसन येथील सौ.मरस्कोले मॅडम तथा गुड्यावरी सौ.पंधरे मॅडम हे शेतकरी संघटनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर पिपरी ग्रामपंचायतीचे शालू ताई मारोतराव बोढे हे संघटनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. आता जानेवारी रोजी उर्वरित जागांसाठी मतदान होणार असून सध्यातरी कोरपना तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी संघटना आघाडीवर गेलेली दिसत आहे. एकंदरीत वामनराव चटप यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या शेतकरी संघटनेची पकड ग्रामीण भागात मजबूत असल्याचे स्पष्ट होते. मात्र तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी आवाळपूर ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने बढती घेतली आहे. कारण तिथे संघटनेच्या चार उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहे. मात्र तिथे एक अपक्ष उमेदवार संघटनेकडे आल्यास अटीतटीची लढत होईल.
बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना अशी थेट लढत कोरपना तालुक्यात बघायला मिळत आहे.
शेतकरी संघटनेच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार आज कोरपना येथे पार पडला.