Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

तळोधी पोलीस स्टेशन ठाणेदार यांचे दिलदारपणा काश्मीरच्या व्यक्तीला मिळविले परिवारासोबत









गेल्या सहा वर्षापासून घरून हरविलेला श्री भारत भूषण स्वर्ण सिंग वय 70 वर्ष वार्ड नंबर 2 काश्मिरी गल्ली , तालुका अखनुर, जिल्हा काश्मीर , (जम्मू काश्मीर ) राज्य या व्यक्तीला त्याच्या परिवारासोबत मिळवून दिले सविस्तर परिस्थिती व पागल्पण भटकणारा एक व्यक्ती दाढी वाढलेला खराब कपडे असलेला एक व्यक्ती 7 जानेवारीला तळोधी पोलीस स्टेशन समोरील रस्त्याने फिरताना आढळला तेव्हा आता ठाणेदार खैरकर यांनी त्याला पोलिस स्टेशनला आणून त्याची विचारपूस केली मात्र तो काही बोलत नसल्याने त्याच्या बद्दल माहिती घेणे अवघड वाटत होते तेव्हा ठाणेदार साहेबांनी त्याच्या हातात कागद व पेन दिली व त्याला काही लिहायला सांगितले. मात्र तरीही तो काही लिहीत नव्हता तेव्हा स्वतः कागदावर फार्म भरल्यासारखा नाव गाव पत्ता लिहून त्यामध्ये त्याला डिटेल टाकायला सांगितली त्या वेळेस त्या व्यक्तीने त्याचा संपूर्ण नाव वार्ड नंबर तालुका गाव आणि जिल्हा राज्य सर्व सविस्तर सांगितला यांनी ऑनलाइन पोलिस स्टेशनचा नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला मात्र ते तर तो व्यक्ती हरवल्याची काही नोंद नसल्याने पुन्हा परिस्थिती बिकट जाणवू लागली मात्र तरीही त्यांच्या आग्रहास्तव काश्मीर पोलिसांनी सांगितलेल्या पत्त्यावर माहिती काढली असता त्याच्या आईने पोलीस स्टेशनला येऊन मी घेऊन जातो असे सांगितले व त्यानुसार खेडकर यांनी त्या व्यक्तीचे आंघोळ स्वतः करून केस कापून कपडे नवीन खरेदी करून त्याची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था पोलीस स्टेशनला केले रुग्ण असलेल्या त्या व्यक्तीने 4-5 दिवस पोलीस स्टेशन मध्येच काढले त्यानंतर आज त्याला घ्यायला आलेल्या सुरेंद्रसिंग तारासिंग (43 वर्ष ) साळा, जांजर कोटरी, व महेश्वरसिंग प्रेमसिंग (वय 33 वर्ष) मित्र, जंजर कोटरी, आज त्याला घ्यायला आले त्याच्यामुळे व तळोधी पोलीस स्टेशनच्या वतीने भरत भूषण स्वर्ण सिंग यांना त्यांच्या स्वाधीन केले व त्यांना जेवणाची व्यवस्था करून कश्मिर करीता रवाना केले. पोलीस स्टेशन कर्मचारी व ठाणेदार खैरकर यांच्या कार्याची परिसरात स्तुती होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies