सचिन तेंडुलकर वाघ बघण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल


चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबीयासह सोमवारी (ता. 25) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला. सचिनचा जवळपास चार दिवसांचा दौरा आहे. दुपारी अलीझंझा गेटमधून तेंडुलकर कुटुंबीयांनी ताडोबात प्रवेश केला.जंगल, वाघ याची आवड असलेल्या सचिन आपल्या परिवारासोबत मागीलवर्षी 24 जानेवारी 2020 रोजी आला होता. तब्बल एक वर्षांनी परत एकदा तेंडुलकर कुटुंबीय ताडोबा भ्रमंतीसाठी आले आहे. सोमवारी (ता. 25) दुपारी तेंडुलकर कुटुंबीयांचे अलिझंझा गेटमधून आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. अंजली, मुलगा अर्जुन, मुलगी सारा यांची उपस्थिती होती. दुपारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअरझोन, बफर झोन आणि व्याघ्रप्रकल्पाला भेट दिली. तेंडुलकर आपल्या कुटुंबासह बफरझोनमध्ये सफारी करणार असल्याची माहिती आहे. येत्या 28 जानेवारीपर्यंत तेंडुलकर कुटुंबीय ताडोबात मुक्कामी असणार आहे.

Post a comment

0 Comments