सिंदेवाही :- येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारकर्तानीच आज पोलिस स्टेशनच्या आवारात आत्महत्या केल्याने खळबळ माजली.
आत्महत्या करणाऱ्या मृतकाचे नाव अशोक राऊत असे 55 असून आज पहाटे त्याने आपल्या भाऊ आणि मामा विरुद्ध घरघुती भांडणाची तक्रार केली होती. त्यानंतर पुन्हा सकाळी 6 च्या दरम्यान पोलिस स्टेशनला आला. पोलिसांनी त्याला बाहेरच्या शेड मध्ये बसण्यास सांगितले, तितेच त्या व्यक्तीने दोरीच्या मदतीने घेतला गळफास, ग्रामीण रुग्णलयात पोलिसांनी उपचाराला नेले पण झाला मृत्यू, प्रकरणाचा तपास सुरू आहे.