रामपूर रहिवासी राजू यादव हे जय भवानी ट्रक असोसिएशनचे सचिव असून त्यांचे स्वतःचे बजरंगबली ट्रान्सपोर्ट आहे.तसेच ते बजरंग दलाचे महासचिव होते. बऱ्याच वर्षांपासून ते बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील कोळसा खाणींमध्ये त्यांचा वाहतुक व्यवसाय सुरू होता. ऐन वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजुरा शहरातील नाका नंबर 3 येथे आज रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मयूर सलून मध्ये सदर व्यावसायिक सलून मध्ये कटिंग करीत असताना अज्ञात मारेक-यांनी दुकानात येवून त्याचेवर तीन गोळ्या झाडल्या. यात व्यावसायिक जागीच ठार झाले. अज्ञात मारेकरी दुचाकीवरून आले होते. त्यांनी देशी कट्याचा वापर केला असल्याचे समजते.
अज्ञात मारेकऱ्यांचा नागरिक आणि पोलिसांनी पाठलाग केला, परंतु ते दुचाकी रस्त्यात सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर व्यावसायिकांची हत्या कोळसा तस्करीतून झाली असावी असा अंदाज वर्तविल्या जात आहे. राजुरा शहरातील नाका नं. ३ हे वर्दळीचे ठिकाण असून येथे अवैध व्यवसाय वाढीस लागत आहेत. या घटनेनेने भितीमय वातावरण निर्माण झाले असून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. राजुरा पोलीसांनी कोळसा व्यावसायिकांचा मृतदेह ताब्यात घेवून आरोपीला पकडण्याची कारवाई रस केली आहे.