चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भारतबंदला शेतकरी,व्यावसायिकांनी दाखवली पाठ
चंद्रपूर :- आज 8 डिसेंबर 2020 रोजी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांकडून राजकीय फायदा घेण्याच्या हेतूने शेतकऱ्याच्या नावाचा वापर करून भारत बंद चा नारा दिला.. परंतु खऱ्या अर्थाने जनतेने त्यांच्या बंदला पाठ फिरवली आहे सर्वात महत्त्वाचे जगाचे पोट भरणारा जगाचा पोशिंदा शेतकरी हा नियमितपणे आपल्या शेतावर काम करताना आढळून आला व अनेक व्यापारी बांधव यांनी आपले प्रतिष्ठाने खुली ठेवली... आणि काही व्यापारी बांधवांना दुकाने खुली ठेवण्याची इच्छा असून सुद्धा झेंडे घेऊन फिरणाऱ्या काही नेत्यांच्या भीतीपोटी दुकानाचे अर्धे दार उघडे करून त्यांनी आपले काम सुरू ठेवले... मग एकीकडे शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे आणि पांढरे कपडे घालून झेंडे घेऊन मिरवणाऱ्या नेत्यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे की तुम्ही बंद करून सिद्ध काय करत आहे..?
आज कोरोना महामारीच्या काळात व्यापारी बांधवांचं मोडलेलं कंबरड कुठेतरी जागेवर येत आहे त्यातच आपण पुन्हा बंदचा मारा त्यांच्या अंगावर लादून नेमकं नुकसान कुणाचं करत आहे आपल्या शेतकरी व व्यापारी बांधवांचं ना...हे आधी लक्षात घेतले पाहिजे.
हे बघा साधं आणि सोपी समीकरण केंद्रसरकारच आहे एखाद्या वस्तूचे जेंव्हा शेतकऱ्याला १० रूपये मिळतात तेंव्हा तीच वस्तू ग्राहक म्हणून मला ४० रूपयांना मिळते.. पण जर ग्राहक ती वस्तू थेट शेतकऱ्याकडून घेऊ शकला आणि शेतकऱ्याने ती २५ रूपयांना जरी विकली तरीही दोघांचाही फायदाच आहे..अनेक शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेच्या माध्यमातून आम्हां शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळत आहे त्यामुळे आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सोबत कायम आहोत अश्या भावना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार दर हंगामाला पीकविमा देतो ग्रामीण भागातील आमच्या बांधवाना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 2 लाख 50 हजार देतो आमच्या शेतकऱ्यांच्या महिलांना गॅस देतो , उघड्यावर संडासला जाऊ नये म्हणून संडास देतो ते सरकार शेतकरी विरोधी असू शकत नाही याउलट महाविकास आघाडी सरकारवर अजूनही शेतकऱ्यांकरिता चांगलं काम करण्याची संधी आहे . भारतबंद करण्यापेक्षा आम्हां शेतकऱ्यांना मदत करावी असा आशावादही अनेकांनी व्यक्त केला