ब्रम्हपुटी:-
तालुक्यातील डोर्ली (चीचगाव) येथे बिबट्याने हल्ला चढवून महिलेला ठार केल्याची खळबळजनक घटना घडली.
मृतक महिलेचे नाव ताटाबाई ठाकटे वय
वर्षे 55 डोर्ली चीचगाव येथील रहिवासी आहे.
आज दिनांक 3 डिसेंबट 2020 ला पहाटे 7:00 वाजताच्या सुमारास मृतक महिला गावालगत शेण टाकण्यासाठी गेली असता वाघाने हल्ला केला. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला.
या वनपरिक्षेत्रात वाघ बिबट्याचे हल्ले दिवसागणिक वाढ होत असल्याने संबंधित वन विभागाने या पिसाळलेल्या हिंस्त्र पशुचा बंदोबस्त कटावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.