Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कार्याचे मूल्यांकन करणारी दिनदर्शिका प्रेरणादायी..आ.मुनगंटीवार


आ सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवाकेंद्राच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

दरवर्षी भिंतीवरील दिनदर्शिका बदलत असते,पण अनेकांमधे बदल होत नाही.त्यांची जीवनशैली तशीच असते.काही लोकं वर्षभराचे नियोजन करून कार्य करतात,व शेवटी आपल्या कार्याचे मूल्यांकन ही करतात.घुग्गुस मधील आ सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राने दिनदर्शिका प्रकाशित करून स्वमूल्यांकन केले आहे.सेवाकार्याचे मूल्यांकन करणारी दिनदर्शिका प्रेरणादायी असते,असे प्रतिपादन आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.ते कोनेरी तलाव येथे आ सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवाकेंद्र तर्फे आयोजित दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमात बुधवार(३० डिसेंम्बर)ला बोलत होते.
या वेळी आ सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवाकेंद्राचे सर्वेसर्वा व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महापौर राखी कांचर्लावार,भाजपा जिल्हाध्यक्ष (श)डॉ मंगेश गुलवाडे,
विवेक बोढे(अध्यक्ष, भाजपा घुग्गुस)
निरीक्षण तांड्रा (उपसभापती, प.स.चंद्रपूर)
संतोष नुने(सरपंच ग्राम पंचायत घुग्गुस) सिनू इसारप (सदस्य ग्राम पंचायत) भाजप नेते शाम आगदारी, प्रविण सोदारि, बबलू सातपुते, निरंजन डंभारे, शरद गेडाम, मधुकर धांडे, अजगर खान, कोमल ठाकरे, अमोल तुलसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

आ मुनगंटीवार पुढे म्हणाले,कोरोना काळात या सेवा केंद्राने केलेले कार्य प्रशंसनीय आहे.स्थानिक नागरिक असो की परप्रांतात अडकलेले नागरिक सर्वांची सोय व सेवा कार्यकर्त्यांनी केली.आपण सारे कोरोना योद्धा अहात,असे म्हणून त्यांनी कौतुक केले.
यावेळी बोलतांना देवराव भोंगळे म्हणाले,आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मुळे घुग्गुसचा विकास झाला.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सेवा केंद्र मार्फत विविध सेवा कार्य केले जातात. भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून येथे दहा बगीच्यांची निर्मिती करण्यात आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेवर विविध विकास कामे, ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी, दहा हायमास्ट लाईट, बसस्टँडची निर्मिती,तीन पिण्याच्या पाण्याची टाकी, विविध ठिकाणी सोलार पंप शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी दहा आरो मशीन, सर्व सर्वधर्मीय प्रार्थना स्थळाचा विकास, पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत, जि प शाळा व अंगणवाडी इमारतीची निर्मिती असे अनेक उपक्रम पूर्ण करण्यात आले.८०० परिवाराला क्षिधापत्रिका,मतदार नोंदणी, अटल विश्वकर्मा सन्मान योजना,आयुष्यमान भारत, रक्तदान शिबिर या सारखे शेकडो उपक्रम राबविले जात असून त्याचा आढावा दिनदर्शिकेत घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक विवेक बोढे यांनी केले तर निरंजन तांड्रा यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies