सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने चंद्रपूर जिल्ह्यातील ह्या समाजाच्या अपेक्षाभंगचंद्रपूर | गोवारी समाज हा आदिवास नसून त्यांना अनुसूचित जमातीचे (एसटी ) सर्व लाभ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाने चंद्रपूर जिल्ह्यातील गोवारींना हादरा बसला आहे, त्यामुळे या निर्णयावर समाजाबांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने चिमूर, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात काही प्रमाणात गोंड-गोवारी समाज आहे. या निर्णयाबाबत चिमुरातील मन्साराम गजबे प्रतिक्रिया देत म्हाणाले की, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय एकतर्फी असल्याचे सांगितले. मागील अनेक वर्षांपासून हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे.

त्यामुळे गोंडगोवारी समाज मोठी आस लावून होता.परंतू सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अपेक्षाभंग झाला आहे, असे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबाबत गोंडगोवारी समाजसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेकांनी नावाचा उल्लेख न करण्याच्या अटीवर आपल्या भावना व्यक्त केल्या. मागील कित्येक वर्षांपासून गोंडगोवारीचे दऱ्याखोऱ्यात वास्तव्य आहे. त्यामुळे त्यांची गणाना आदिवासींमध्ये व्हावी,ही न्यायिक मागणी होती. परंतु कोर्टात निर्णय हा आम्हाला धक्का देणारा आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

Post a comment

0 Comments