"किसान आंदोलन चंद्रपूर आक्रमक.. विसापूर येथे केले 'टोल मुक्ती'आंदोलन"

14 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात धरणे

चंद्रपूर प्रतिनिधी
- : दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलन तर्फे आज दिनांक 12 डिसेंबर रोजी देशव्यापी टोलमुक्ती आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली होती.या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी किसान आंदोलन चंद्रपूर ने जन विकास सेनेचे अध्यक्ष मनपा नगरसेवक पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात सकाळी दहा वाजताचे दरम्यान बल्लारपूर रोडवरील विसापूर टोल नाका येथे टोलमुक्ती आंदोलन केले. शेकडोंच्या संख्येने किसान आंदोलन चंद्रपूर चे कार्यकर्ते टू व्हीलर व वाहनांनी रॅली घेऊन विसापूरच्या टोलनाक्याच्या दिशेने निघाले.त्यानंतर विसापूर टोल नाका येथे थांबून शेकडो शेतकरी बांधवांनी किसान एकता जिंदाबाद,जय जवान-जय किसान,भारत माता की जय अशी नारेबाजी केली.आदोलकांनी टोल नाक्यावरून जाणाऱ्या जड वाहनांसाठी टोलनाका मुक्त केला. यावेळी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.परंतु आंदोलकांनी बळजबरीने वाहने सोडणे सुरू केल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.यानंतर बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक श्री पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची कुमक मागविण्यात आली.पोलिसांनी आंदोलनकांना अटक करून बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले.आंदोलकां विरुद्ध कलम 68 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना सोडण्यात आले.
या आंदोलनामध्ये किसान आंदोलन चंद्रपूर चे चमकोर सिंग बसरा, बलबीर सिंग गुरम,गुरूपाल सिंग, ग्यान सिंग, जितेंद्र सिंग बलोदा, दलजीत सिंग नरेन यांच्या नेतृत्वात असंख्य शीख बांधवांनी तसेच जन विकास सेना ग्रामीण शाखेचे अनिल कोयचाळे,धर्मेंद्र शेंडे,
चंदू झाडे,प्रवीण मटाले,आकाश लोडे, हरिदास निकुरे, सत्यजित वाघमारे, भैय्याजी मोहुर्ले, जिवन कोटरंगे, संदीप पेंदोर,गोविंदा नगराळे, परशुराम रामटेके, रमेश खोब्रागडे, जगन धुर्वे, शंकर कोटरंगे, बंटी रामटेके,धनराज जुनघरे,शिवदास शेंडे यांचेसह शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी जन विकास सेनेचे मनीषा बोबडे,अक्षय येरगुडे,इमदाद शेख, गितेश शेंडे, राहुल दडमल,साईनाथ कोंतमवार, किशोर महाजन,देवराव हटवार,भाग्यश्री मुधोळकर,बबिता लोडेल्लीवार,नामदेव पिपरे,इमरान रजा, शैलेंद्र सिंग,करमविर यादव,गोविंद प्रसाद,अंकित ठाकूर इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
दरम्यान दिल्ली येथील किसान आंदोलनातील आंदोलकांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवे कृषी कायदे तयार करण्याच्या व हमी भावाला कायदेशीर संरक्षण देण्याच्या मागणीसाठी दिनांक १४ डिसेंबर रोजी देशपातळीवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ची घोषणा केलेली आहे.किसान आंदोलन चंद्रपूर तर्फे सुध्दा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येणार आहे.या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन किसान आंदोलन चंद्रपूरचे पप्पू देशमुख,चमकोर सिंग बसरा व बलबिल सिंग गुरम यांनी
केलेले आहे.
Post a comment

0 Comments