ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना विनातिकीट सफारी करविणाऱ्या वनरक्षकासह एजंटला अटक

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना विनातिकीट सफारी करविणाऱ्या दोघांविरुद्ध चिमूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वनरक्षकासह एका एजंटचा समावेश आहे. पर्यटकांना परवानगी नसताना जास्तीची रक्कम घेऊन ताडोबात व बफर झोनमध्ये हे आरोपी प्रवेश देत होते. आरोपींमध्ये वनरक्षक सोनुने, सचिन कोयचाडे यांचा समावेश आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही पर्यटकांकडून फोनवर पैसे घेत होते.
वनअधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

Post a comment

0 Comments