अजयपूर जवळ भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू तर 1 गंभीर

मूल – 15 डिसेंम्बर मंगळवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास अजयपूर जवळ झालेल्या भीषण अपघातात मूल शहरातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

मृतकांमध्ये राजू पटेल, सलीम शेख यांच्या कुटुंबातील 2 मूल, तर विष्णू उधवांनी व शिक्षक निमगडे यांच्या कुटुंबातील 2 मुली असा एकूण 4 जणांचा समावेश आहे.

चंद्रपूर वरून वाढदिवस साजरा करून हे आपल्या घरी येण्याचा दिशेने निघाले होते, यांचं चारचाकी वाहन क्रमांक एम एच 34 एएम 9297 गाडीला एका ट्रॅक्टर ने जोरदार धडक दिली असता 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.


या चारही कुटुंबावर काळाने घात केल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Post a comment

0 Comments